agriculture news in marathi, Jigon project tender scam, akola | Agrowon

जिगाव प्रकल्पाची निविदा मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांची "कृपादृष्टी'
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

बुलडाणा : जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या कामाची निविदा यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पदाचा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे.

बुलडाणा : जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या कामाची निविदा यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पदाचा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे.

संबंधित बांधकाम कंपनी व स्वत:ला आर्थिक फायदा करून घेण्यासाठी जिगाव प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. यामुळे शासनाची मोठी फसवणूक झाली असून या प्रकरणाची खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. यात जिगाव प्राधिकरण, जलसंपदा व पाटबंधारे विभागातील अभियंता व अधिकाऱ्यांवर शनिवारी (ता. 4) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत हे बडे अधिकारी गळाला लागल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात नांदुरा तालुक्‍यात पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत संबंधित कंत्राटदाराशी संगनमत करून गैरप्रकार करीत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बुलडाणा येथील पोलिस निरीक्षक सोपान भाईक यांनी केलेल्या चौकशीत संबंधित अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली.

या तक्रारीवरून यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे संचालक सुमित रमेशचंद्र बाजोरिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, अमरावती जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, नागपूर येथील गोसे खुर्द सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता सो. रा. सूर्यवंशी, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता शरद गावंडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भा. सा. वावरे, मन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर. जी. मुंधडा, नाशिकच्या मध्यवर्ती सिंचन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता भीमाशंकर पुरी या अधिकाऱ्यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बांधकाम कंपनीच्या मागील पाच वर्षांतील उलाढालीचा विचार न करता केवळच दोनच वर्षांची सरासरी विचारात घेऊन त्यावर 20 टक्के नियमबाह्य व बेकादा सूट देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्य अभियंत्याने बाजोरिया कन्स्ट्रक्‍शन कंपनीला निविदेसाठी पात्र ठरविले. त्याला पूर्व अर्हता तपासणी समितीनेही विरोध केला नाही. या प्रकरणात सात अभियंत्यांनी शासनाची फसवणूक करीत कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत सात अभियंते दोषी आढळले आहेत.

जिगाव प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता मोठे अधिकारी यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. खामगाव, अमरावती, नाशिक व नागपूर येथील बड्या अधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याने खळबळ उडाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...