agriculture news in Marathi, jinners ready for purchase on 900 rupees per bale, Maharashtra | Agrowon

जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९०० रुपये प्रतिगाठीने तयार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

आर्द्रता व ट्रॅश या अटी वगळून जिनिंग व्यावसायिक ९०० रुपये प्रतिगाठ या दरात सीसीआयचे खरेदी केंद्र आपल्या जिनिंग व प्रेसिंग कारखान्यात सुरू करण्यास तयार आहेत. मागील वर्षी सीसीआयने ७८५ रुपये प्रतिगाठ, असे दर दिले होते. यंदा वीजदर २५ टक्के अधिक आहेत. इतर खर्च वाढले आहेत. ही बाब लक्षात घेता ९०० रुपये दर मिळणे अपेक्षित आहे. 
- अविनाश काबरा, महाराष्ट्र जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदीचा तिढा मध्य प्रदेश, महाराष्ट्रात कायम आहे. जिनर्सनी कुठल्याही अटी व शर्तींशिवाय ९०० रुपये प्रतिगाठ (एक गाठ १६० किलो रुई) या दरात सीसीआयचे केंद्र आपल्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यात सुरू करण्याची तयारी केली आहे. परंतु सीसीआयने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. सीसीआयने अटी व शर्तींशिवाय ८०० रुपये प्रतिगाठ असे दर देऊ, अशी भूमिका मांडली आहे. 

सीसीआयची खरेदी देशात फक्त तेलंगण व आंध्र प्रदेशात सुरू आहे. आंध्र प्रदेशात मागील महिन्यात केंद्र सुरू झाले. तेथे अडीच टक्के ट्रॅश व आठ टक्के आर्द्रता या अटी जिनर्सनी स्वीकारल्या आहेत. या अटींचे पालन करून ११२५ रुपये प्रतिगाठ या दरात कापसाची जिनिंग व प्रेसिंग करायची कार्यवाही तेथे सुरू झाली आहे. 

राज्यात महाराष्ट्र जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनने अडीच टक्के ट्रॅश व आठ टक्के आर्द्रता या अटी वगळल्या जाव्यात. या अटी वगळल्या तर जिनर्स कापसाची जिनिंग व प्रेसिंग ९०० रुपये प्रतिगाठ (एक गाठ १६० किलो रुई) या दरात करायला तयार असल्याचा प्रस्ताव सीसीआयला दिला आहे. त्यावर सीसीआयने अटी व शर्तींशिवाय ८०० रुपये प्रतिगाठ असा दर देऊ, अशी भूमिका जिनर्ससमोर मांडली आहे. परंतु जिनर्सनी ८०० रुपयांचे दर नामंजूर केले आहेत. 

तिढा कायम असल्याने सीसीआय व जिसर्नमध्ये खरेदी केंद्र सुरू करायचे करार पूर्ण झालेले नाहीत. मध्य प्रदेशात सात वेळेस खरेदी केंद्रांसाठी सीसीआयने निविदा काढल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही. तेथेही कापूस खरेदी ठप्पच आहे. 

खुल्या बाजारात येण्याची तयारी
सीसीआय लवकरच जिनर्सच्या भूमिकेसंबंधी विचारविनियम करून निर्णय जाहीर करणार आहे. सध्या मध्य भारतात कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक आहेत. ही बाब लक्षात घेता सीसीआय खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदीची तयारी करीत आहे. खुल्या बाजारात जे दर असतील, त्या दरात सीसीआय खरेदी करील. राज्यात मराठवाडा व खानदेशात (नगर, नाशिकसह) येत्या २० नोव्हेंबरनंतर सीसीआय खुल्या बाजारात कापूस खरेदीची कार्यवाही सुरू करील, अशी माहिती मिळाली आहे. येत्या २० तारखेपर्यंत सीसीआय खरेदीचे करार करील. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील जिनर्सची दरांची मागणी लक्षात घेता मार्ग काढण्यासंबंधी सीसीआयच्या वरिष्ठ कार्यालयात हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

सध्या ओलावा अधिक
सध्या पूर्वहंगामी व कोरडवाहू कापसात थंड व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे किमान नऊ टक्के आर्द्रता येत आहे. तसेच दर्जेदार कापसातही साडेतीन टक्‍क्‍यांपर्यंत ट्रॅश (कचरा) येतो. नऊ टक्के आर्द्रता व साडेतीन टक्के ट्रॅशच्या गाठी परदेशात निर्यातीसाठी चालतात. त्यांना दर्जेदार गाठी म्हणून चांगले दरही मिळतात. सीसीआयला आपल्या निकषानुसार सध्या राज्यात अपवाद वगळता कुठेही कापूस मिळणार नाही, असे जिनर्सचे म्हणणे आहे. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...