agriculture news in Marathi, Jinners response to CCI procurement, Maharashtra | Agrowon

‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी जिनर्सकडून निविदांचा पाऊस
चंद्रकांत जाधव
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) सहाव्या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, खानदेश व मराठवाडा विभागासंबंधी ९२ निविदा जिनर्सकडून आल्या आहेत. निविदा भरणाऱ्या कमाल जिनर्सनी प्रतिगाठ (१७० किलो रुई) १३०० रुपये दर मागितल्याची माहिती मिळाली आहे. 

जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) सहाव्या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, खानदेश व मराठवाडा विभागासंबंधी ९२ निविदा जिनर्सकडून आल्या आहेत. निविदा भरणाऱ्या कमाल जिनर्सनी प्रतिगाठ (१७० किलो रुई) १३०० रुपये दर मागितल्याची माहिती मिळाली आहे. 

‘सीसीआय’ला या प्रक्रियेत आणखी स्पर्धा हवी असून, निविदा भरण्यासाठी आणखी १५ तारखेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्यांना निविदा भरल्या त्यांना लवकरच दरांसंबंधी वाटाघाटीसाठी सीसीआयच्या औरंगाबाद येथील वरिष्ठ कार्यालयात बोलाविण्यात येणार आहे. सध्या एकाच वेळी मराठवाडा, खानदेश (नगर, नाशिकसह) व विदर्भात जिनिंगमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याची निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. ‘सीसीआय’च्या संकेतस्थळावर त्यासंबंधीची कार्यवाही करता येते. ‘सीसीआय’च्या मागील पाच निविदा प्रक्रियांना दरांचे वाट व नवे नियम, अटी यांमुळे प्रतिसादच मिळाला नव्हता. यामुळे खरेदीची प्रक्रिया लांबली आहे. 

जिनर्स एकवटले
‘सीसीआय’ लवकरच दरांसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी बोलाविणार असल्याने जिनर्सनी महाराष्ट्र राज्य जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनच्या माध्यमातून ‘सीसीआय’शी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. या असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल यांच्याशी त्यासंबंधीची चर्चा खानदेश, मराठवाडामधील जिनर्स करणार आहेत. 

१३०० रुपयांत रुई, सरकी वेगळी करण्याची जबाबदारी
मागील वर्षी सीसीआयने एका गाठीसंबंधी ७८५ रुपये दर दिला होता. परंतु त्यात घट व इतर खर्चाचा अंतर्भाव नव्हता. यंदा जिनिंगमध्ये कापूस आल्यानंतर त्यावर सर्व प्रक्रिया करून सरकी व रुई वेगळी करून, प्रेसिंगची प्रक्रिया केली जाईल. मग १७० किलोची गाठ तयार करून द्यायची आहे. जिनर्सला कापसाची तोलाई, साठवणूक, संरक्षण (ताडपत्रीने झाकणे व इतर बाबी), रुई तयार करणे, सरकी एका ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने साठविणे या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. यासाठी आवश्‍यक सर्व मजुरी व इतर खर्च करायचा असून, यामुळे १३०० रुपये दर जिनर्सनी मागितल्याची माहिती जिनिंग प्रेसिंग असोसिएशनच्या सूत्रांनी दिली. 

प्रतिक्रिया 
‘सीसीआयक’कडे आम्ही १३०० रुपये प्रतिगाठ, असा दर मागितला आहे. त्यांच्याकडून लवकरच बोलावणे येईल. आम्ही आता ‘सीसीआय’शी राज्य असोसिएशनच्या माध्यमातून बोलणी करू. दर परवडणारे नसले तर या प्रक्रियेतून बाहेर पडू. 
- अविनाश भालेराव, जिनिंग व्यावसायिक, जळगाव

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...