agriculture news in marathi, job guarantee scheme status, mumbai, maharashtra | Agrowon

राज्यात गेल्या वर्षी 'मनरेगा'तून २४०० कोटींची कामे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सरत्या वर्षात (२०१८-१९) २३९६ कोटींची कामे झाली आहेत. यात मजुरीवर (अकुशल) १ हजार ६५४ कोटी तर साहित्य व पुरवठ्यावर (कुशल) ७४२ कोटी रुपये खर्च झाला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षातील खर्च सर्वाधिक आहे. योजनेतून वर्षभरात १७ लाख ९० हजार कुटुंबातील सुमारे ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ८४६ लाख मनुष्य दिन रोजगारनिर्मिती झाली आहे. पाच वर्षांत सर्वाधिक मनुष्य दिननिर्मितीचे लक्ष्य राज्यात पूर्ण झाले आहे.

मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सरत्या वर्षात (२०१८-१९) २३९६ कोटींची कामे झाली आहेत. यात मजुरीवर (अकुशल) १ हजार ६५४ कोटी तर साहित्य व पुरवठ्यावर (कुशल) ७४२ कोटी रुपये खर्च झाला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षातील खर्च सर्वाधिक आहे. योजनेतून वर्षभरात १७ लाख ९० हजार कुटुंबातील सुमारे ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ८४६ लाख मनुष्य दिन रोजगारनिर्मिती झाली आहे. पाच वर्षांत सर्वाधिक मनुष्य दिननिर्मितीचे लक्ष्य राज्यात पूर्ण झाले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या गावातच शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये नियोजनाला प्राधान्य दिले जाते. प्रत्येक वर्षी कामाचा वार्षिक आराखडा तयार करून २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये ग्रामसभा घेऊन कामे मंजूर करणे आवश्यक आहे.  

वैयक्तिक लाभाची दोन कोटी कामे पूर्ण
योजनेंतर्गत ग्रामीण भागात विविध वैयक्तिक कामांनासुद्धा प्राधान्य देण्यात येते. या वर्षात वैयक्तिक कामे योजनेंतर्गत २ कोटी ७ लाख कामे पूर्ण झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात २० हजार ३६५ कामे, अमरावतीत १५ हजार २९३, जळगावमध्ये १२ हजार ५०५, यवतमाळमध्ये ११ हजार ८४० तर नंदुरबार जिल्ह्यात ११ हजार ६२१ सर्वाधिक वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण झाली आहेत.
योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक विहिरी, पाझर तलाव, खोलीकरण, रस्ते, नाला सरळीकरण आदी कामे घेण्यात येतात. या कामांमुळे भूजल पातळीत वाढ शाश्वत सिंचन क्षमता निर्माण होते. या सोबतच वैयक्तिक स्वरूपांच्या कामांनासुद्धा प्राधान्य दिले जात असल्यामुळे मागेल त्याला १५ दिवसांच्या आत अकुशल रोजगार व १५ दिवसांच्या आतच बँक अथवा पोस्ट खात्यात मजुरी जमा केली जाते.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक सिंचन विहिरी पूर्ण
मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे स्वत:ची संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सिंचन विहिरींना प्राधान्य देण्यात आले आहे. या विहिरींच्या कामाला ३ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१८-१९ या वर्षात ३९ हजार सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे मागील पाच वर्षांमध्ये १ लाख ४२ हजार सिंचन विहिरी पूर्ण झाल्या असून प्रतिविहीर सरासरी दोन एकर याप्रमाणे किमान २ लाख ८४ हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. राज्यात सर्वाधिक सिंचन विहिरी बीड जिल्ह्यात ३ हजार ८०८ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार २९७, धुळ्यात ३ हजार १०७, अमरावतीत २ हजार ९७० तर जालना जिल्ह्यात २ हजार ४६८ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत.

राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये मजुरांना त्यांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आगामी २०१९-२० या वर्षासाठी केंद्र शासनाने ९ कोटी मनुष्यदिननिर्मितीच्या उद्दिष्टाला मान्यता दिली आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये कामांचे नियेाजन प्राधान्य पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती मनरेगा आयुक्त के. एस. आर. नायक यांनी दिली.

९४ टक्के मजुरीचे वेळेत वाटप
मनरेगांतर्गत काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मजुरीचे वाटप वेळेत करण्याच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. २०१८-१९ या वर्षात वेळेवर मजुरी वितरित करण्याची टक्केवारी ९४ टक्के इतकी आहे. भंडारा व बुलडाणा जिल्ह्यांत मजुरांना वेळेवर मजुरी दिली जाते. नागपूर जिल्ह्यात ९९.९२ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात ९९.७६ टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात हेच प्रमाण ९९.४६ टक्के एवढे आहे. मजुरांना वेळेवर मजुरी मिळावी, यासाठी मनरेगा आयुक्तालयाच्यावतीने नियमित पाठपुरावा करण्यात येतो.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...