परभणी जिल्ह्यात मनरेगाच्या कामांवर ६२४५ मजूर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू आठवड्यात जिल्ह्यातील सात तालुक्यांत ६२४५ मजूर कामांवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत परभणी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर ८७ आणि यंत्रणा स्तरावर ६ अशी ९३ कामे सुरू असून, त्यावर ४४९५ मजुरांची उपस्थिती आहे. जिंतूर तालुक्यात ग्रामपंचायत आणि यंत्रणांची मिळून ७४ कामे सुरू असून, त्यावर ३३४ मजूर उपस्थिती आहे. 
 
मानवत तालुक्यात ७ कामांवर ५३४ मजूर, पाथरी तालुक्यातील २ कामांवर १५० मजूर, सोनपेठ तालुक्यातील ६ कामांवर ५७६ मजूर आहेत. गंगाखेड ३ कामांवर ९२ मजूर, पालम तालुक्यात २ कामांवर ६४ मजूर उपस्थिती आहे. ग्रामपंचायत स्तरावर ४५७३ आणि यंत्रणा स्तरावर ३४५८ असे एकूण ८०३१ शेल्फवरील कामे आहेत.  ग्रामपंचायत स्तरावर २६ लाख ९४ हजार ६५३ आणि यंत्रणा स्तरावर १६ लाख ५९ हजार ६८८ मनुष्य दिन मजूर क्षमता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com