agriculture news in marathi, journey of return monsoon starts?, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार?
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

पुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे स्थिरावला अाहे. राजस्थानमध्ये हवामान कोरडे होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) माघारी फिरण्यास पोषक हवामान तयार होऊ लागले आहे. त्यामुळे देशातून माॅन्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे स्थिरावला अाहे. राजस्थानमध्ये हवामान कोरडे होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) माघारी फिरण्यास पोषक हवामान तयार होऊ लागले आहे. त्यामुळे देशातून माॅन्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

साधारणत: १ सप्टेंबर रोजी पश्‍चिम राजस्थानमधून माॅन्सून परत फिरतो. यंदा मात्र मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला असून, १० सप्टेंबर उलटूनही माॅन्सून माघारी फिरलेला नाही. मात्र, माॅन्सूनचा आस उत्तरेकडे स्थिरावला असून त्याचा पूर्व भागही ईशान्य राज्यांकडे सरकला आहे. 

१३ ते १५ सप्टेंबर राेजी हिमालयाच्या पश्‍चिम भागात पश्‍चिमी चक्रावात तयार होण्याची शक्यता आहेत. तर १२ सप्टेंबरपासून पश्‍चिम राजस्थान आणि १३ सप्टेंबरपासून पूर्व राजस्थानात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. गतवर्षी २७ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. तर २५ अॉक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. 

राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे तापमान ३३ अंशांवर तर मालेगाव, सोलापूर, डहाणू, नागपूर, यवतमाळ येथे तापमान ३२ अंशांवर गेले आहे. तर राज्यात ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली अाहे. 

सोमवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.६ (१७.५), जळगाव ३३.२ (२४.०), कोल्हापूर २९.३(१९.७), महाबळेश्‍वर १९.८(१६.०), मालेगाव ३२.०(२०.४), नाशिक २८.५(१७.५), सांगली ३०.४(१७.९), सातारा ३०.१(१७.१), सोलापूर ३२.७ (२०.७), सांताक्रुझ ३१.१(२३.८), अलिबाग ३१.२(२३.४), रत्नागिरी २९.३(२२.६), डहाणू ३२.०(२३.७), आैरंगाबाद ३१.० (१८.६), परभणी ३२.५(१९.९), नांदेड - (२१.०), अकोला ३३.६(२०.८), अमरावती ३१.४(२०.८), बुलडाणा ३३.२ (१९.३), चंद्रपूर ३३.२ (२२.२), गोंदिया ३०.८(२१.८), नागपूर ३२.४(२१.१), वर्धा ३१.७(२२.५), यवतमाळ ३२.० (२०.४).

तापमान वाढण्याची शक्यता
मॉन्सूनला जोर राहिला नसल्याने राज्यात पाऊस थांबला आहे. राज्यात मुख्यत: कोरडे हवामान राहणार असल्याने तापमानात १ ते २ अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. तर बुधवारपर्यंत (ता. १२) मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा, शुक्रवारपर्यंत (ता. १४) उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...