agriculture news in marathi, Jowar 2100 per quintal in Khandesh | Agrowon

खानदेशात ज्वारीची आवक घटली; दर प्रतिक्विंटल २१००
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक घटली असून, कमाल दर २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन फक्त ५०० तर धुळ्यात ३०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक घटली असून, कमाल दर २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन फक्त ५०० तर धुळ्यात ३०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

ज्वारीला उच्चांकी दर मिळाले आहेत. परंतु आवक कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फारसा लाभ नसल्याचे म्हटले जात आहे. कारण जळगावात फक्त सुमारे २१ हजार हेक्‍टवर पेरणी झाली होती. तर धुळ्यातही १७ हजार हेक्‍टरपर्यंत पेरणी झाली होती. पावसाच्या लहरीपणामुळे पिकाला फटका बसला. तरी काळी कसदार जमीन असलेल्या भागात उत्पादन बरे आले. जळगाव तालुक्‍यातील ममुराबाद, जुने जळगाव भागातील काही शेतकऱ्यांना एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन आले. तर चाराही चांगला मिळाला. ज्वारीची मळणी १०० टक्के आटोपली आहे.

ज्वारीला सुरवातीला ११०० रुपयांपासून दर होते. या महिन्याच्या सुरवातीला जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव बाजार समित्यांमध्ये मिळून प्रतिदिन १००० क्विंटलपर्यंत आवक होत होती. पण या महिन्याच्या मध्यात आवक कमी झाली. तसे दरही वधारले. ते आजघडीला २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा व अमळनेर बाजार समितीत अधिक आवक होत आहे.

जळगाव बाजार समितीत प्रतिदिन फक्त १०० क्विंटलपर्यंत आवक आहे. धुळे जिल्ह्यात धुळे, दोंडाईचा व शिरपूर बाजार समितीत मिळून ३०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. लिलाव लागलीच आटोपत आहेत. काळ्या कसदार जमिनीत दर्जेदार उत्पादन आले आहे. त्यामुळे या ज्वारीला दरही बऱ्यापैकी मिळत आहेत. सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.

इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी...सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
जळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटलजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता...
परभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवातपरभणी  ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट...
कोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३००० ते...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात विविध...
औरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढलीनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या...
कोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह...
परभणीत कोबी प्रतिक्विंटल ४०० ते ८००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
खानदेशातील सोयाबीन आवक घटलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०...सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
बारामतीत ज्वारीचे दरप्रतिक्विंटल चार...पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...