राज्यातील आठ जिल्ह्यांत ज्वारीचे पीक प्रात्यक्षिक
सुर्यकांत नेटके
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017
नगर : ज्वारीचे कमी उत्पादन असलेल्या राज्यातील आठ जिल्ह्यांमधील १८ हजार हेक्‍टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या भरडधान्य विकास कार्यक्रमातून हा उपक्रम राबवला जात आहे. अभियानात निवडलेल्या शेतकऱ्यांना बियाणे, बीजप्रक्रियेचे साहित्य आणि फवारणीसाठी कीडनाशके देण्यात येणार आहेत. या प्रकल्पावर पाच कोटी ७६ लाख रुपये खर्च होणार असून दहा हेक्‍टरचा (शंभर एकर) एक प्रकल्प असेल.  
 
नगर : ज्वारीचे कमी उत्पादन असलेल्या राज्यातील आठ जिल्ह्यांमधील १८ हजार हेक्‍टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या भरडधान्य विकास कार्यक्रमातून हा उपक्रम राबवला जात आहे. अभियानात निवडलेल्या शेतकऱ्यांना बियाणे, बीजप्रक्रियेचे साहित्य आणि फवारणीसाठी कीडनाशके देण्यात येणार आहेत. या प्रकल्पावर पाच कोटी ७६ लाख रुपये खर्च होणार असून दहा हेक्‍टरचा (शंभर एकर) एक प्रकल्प असेल.  
 
खरीप व रब्बी हंगामात कमी उत्पादन असलेल्या बाजरी, नाचणी, मका, खरीप ज्वारी व रब्बी ज्वारीचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानमधील भरडधान्य विकास कार्यक्रमातून पीक प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. बाजरी, नाचणी, मका, खरीप ज्वारी व रब्बी ज्वारीचे मिळून ३६ हजार ४१२ हेक्‍टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकांचे यंदा कृषी विभागाने नियोजन केले होते. त्यासाठी १२ कोटी ७८ लाख १७ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली.
 
यंदाच्या रब्बी ज्वारीचे राज्यातील आठ जिल्ह्यांतील १८ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक घेतले जात आहे. त्यासाठी दहा हेक्‍टरचा एक प्रकल्प असून एका शेतकऱ्याचे एका हेक्‍टरपर्यंतचे क्षेत्र प्रकल्पात समाविष्ट असेल. प्रती हेक्‍टरसाठी तीन हजार रुपये खर्च होईल.
 
ज्वारीचे कमी उत्पादन असलेल्या नगरमधील अकरा तालुक्‍यांतून ७३ गावांची प्रात्यक्षिकांसाठी निवड केली आहे. प्रात्यक्षिकांसाठी मागणी करण्यात आलेले बियाणे प्राप्त झाले आहे. या उपक्रमामुळे ज्वारीचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे, असे कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी सांगितले. 
 
जिल्हानिहाय प्रकल्प, कंसात त्यासाठी होणारा खर्च 
नगर ः ३५० (एक कोटी बारा लाख), पुणे ः २५० (८० लाख), सोलापूर ः ३१० (९९ लाख २० हजार), सातारा ः २१० (६७ लाख २० हजार), सांगली ः १६० (५१ लाख २० हजार), औरंगाबाद ः ८० (२५ लाख ६० हजार), बीड ः १८० (५७ लाख ६० हजार), उस्मानाबाद ः २६० (८३ लाख २० हजार).
 
नगर जिल्ह्यामधील प्रकल्पांची संख्या
तालुका प्रकल्प
नगर २०
पारनेर २२
पाथर्डी १४
कर्जत ५०
जामखेड ५०
श्रीगोंदा २०
राहुरी ३०
नेवासा १४
संगमनेर १०
कोपरगाव ५०
राहाता ७०

 

 
 
 
 

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...