agriculture news in marathi, jowar, gram harvesting started, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात हरभरा, ज्वारीची काढणी सुरू
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
औरंगाबाद  : मराठवाड्यात यंदा अपेक्षित सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०४ टक्‍के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र हरभरा व रब्बी ज्वारीचे आहे. सध्या या पिकांच्या काढणीला वेग आला आहे.
 
औरंगाबाद  : मराठवाड्यात यंदा अपेक्षित सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०४ टक्‍के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र हरभरा व रब्बी ज्वारीचे आहे. सध्या या पिकांच्या काढणीला वेग आला आहे.
 
मराठवाड्यात यंदा खरिपाची पिके पावसाअभावी हातची गेली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली. परंतु औरंगाबाद वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांत यंदा गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान झाले. जवळपास पावणेदोन लाख हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकीकडे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच दुसरीकडे पक्‍व झाल्याने रब्बी ज्वारी व हरभऱ्याच्या काढणी व मळणीच्या कामाला वेग आला आहे. 
 
मराठवाड्यात यंदा ४ लाख २६ हजार २५२ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित असताना दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर अर्थात ९ लाख ७ हजार ८० हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. दुसरीकडे रब्बी ज्वारीची ८ लाख ९६ हजार हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित असताना, सर्वसाधारण क्षेत्राच्या ७१ टक्‍के क्षेत्रावर म्हणजे ६ लाख ३६ हजार हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती.
 
या पिकांपाठोपाठ गव्हाची २ लाख ६५ हजार, मक्‍याची ४२ हजार ४४७, रब्बी तिळाची ६९, करडईची २८ हजार २३५, जवसाची २२३२, सूर्यफुलाची ३८२३ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. रब्बी ज्वारी व हरभरा ही दोन मोठी पिके पक्‍वतेमुळे काढणीच्या अवस्थेला आली आहेत.
 
गहू पीक काही ठिकाणी पक्‍वतेच्या तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. करडईचे पीकही काढणीच्या अवस्थेत आहे. मक्‍याचे पीक पक्‍वतेच्या अवस्थेत आले असून, काही ठिकाणी मकाचीही काढणी सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...