agriculture news in marathi, jowar, gram harvesting started, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात ज्वारी, हरभरा काढणीस सुरवात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
मी साधारणपणे डिसेंबरमध्ये दहा गुंठ्यांवर हरभऱ्याची पेरणी केली होती. सध्या हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे काढणीस एक महिना बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी केली होती, त्यांच्या हरभऱ्याची काढणी सुरू आहे.  
- सुभाष जगताप, जांबूत, ता. शिरूर, जि. पुणे. 

पुणे  ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभऱ्याच्या काढणीस सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांत शेतकऱ्यांना मजूरटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे वाढीव मजुरी देत शेतकरी ज्वारी व हरभऱ्याची काढणी करीत आहे. काही ठिकाणी काढणी केलेल्या ज्वारी व हरभऱ्याची मशिनच्या साह्याने मळणी सुरू असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण चार लाख चार हजार ७३ हेक्‍टरपैकी दोन लाख ७५ हजार ७५२ हेक्‍टर म्हणजेच ६८ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍यांत खरीप हंगाम प्रामुख्याने असतो. त्यामुळे रब्बी हंगामात या तालुक्‍यात अत्यंत कमी प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसून येते.
 
पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यांत रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. सध्या रब्बी ज्वारी, हरभरा वगळता गव्हाचे पीक अनेक ठिकाणी उभे आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारीची एक लाख ५७ हजार ८१०, तर हरभऱ्याची ४७ हजार ३२० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 
 
रब्बी ज्वारी पेरणीत जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर हे तालुके आघाडीवर आहेत. जिल्ह्यात शिरूर तालुक्‍यात सर्वाधिक ३५ हजार हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्या खालोखाल बारामती, पुरंदर तालुक्‍यांतही पेरणी झाली असून, या भागातच काढणीची कामे वेगात सुरू आहेत. जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. बारामतीमध्ये १४ हजार ७८० तर जुन्नरमध्ये १२ हजार ४०० हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
 
पावसाळ्याच्या शेवटी बराच काळ वाफसा न झाल्यामुळे आणि बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाल्यामुळे ज्वारीऐवजी गहू आणि हरभरा पिकास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यामुळे गहू, हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र अवघे ५८ टक्के आहे. गव्हाचे ८०, तर हरभऱ्याचे ९८ टक्के क्षेत्र आहे. त्यातच कीड-रोगाचा फारसा प्रादुर्भाव न झाल्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे.
 
याबाबत न्हावरे (ता. शिरूर ) येथील गीताराम कदम म्हणाले, की मी तीन एकरावर ज्वारीचे पीक घेतले. त्याची चार ते पाच दिवसांपूर्वी काढणी केली. तसेच दोन एकर हरभरा होता, त्याचीही काढणी केली आहे.   
 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...