agriculture news in marathi, Jowar Harvest signs next week | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ज्वारीची कापणी पुढील आठवड्यात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

जळगाव : जिल्ह्यात बेवड म्हणून रावेर, यावल, चोपडा, पाचोरा भागात ज्वारीचे दाणे पक्व होत आहेत. पीक काळ्या कसदार जमिनीत पीक बऱ्यापैकी असून, पुढील आठवड्यात ज्वारीची कापणी होईल, असे संकेत आहेत.

जळगाव : जिल्ह्यात बेवड म्हणून रावेर, यावल, चोपडा, पाचोरा भागात ज्वारीचे दाणे पक्व होत आहेत. पीक काळ्या कसदार जमिनीत पीक बऱ्यापैकी असून, पुढील आठवड्यात ज्वारीची कापणी होईल, असे संकेत आहेत.

जिल्ह्यात खरिपात तृणधान्यामध्ये सर्वाधिक ज्वारीची पेरणी केली जाते. जवळपास ७० हजार हेक्‍टवर पेरणी झाली होती. मध्यंतरी पावसाने ताण दिल्याने हलक्‍या, मुरमाड जमिनीत कणसे बारीक पडली. दाणे भरण्यास अडथळे आले. वाढही खुंटली होती. परंतु निसवणीच्या वेळेस भीजपाऊस झाला. यामुळे कणसे येऊन दाणे भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली. मागील काही दिवसांपासून कोरडे वातावरण असल्याने काळ्या कसदार जमिनीत कणसे जोमात भरत आहेत. यंदा उत्पादन व चारा बऱ्यापैकी येईल, अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीची अधिक पेरणी केली आहे. ज्वारीचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्यात रब्बी पिकांची पेरणी होईल.

ज्यांच्याकडे पाणी आहे, ते केळीची लागवड करतील. रावेर, चोपडा व यावल भागात केळी पिकासाठी बेवड म्हणून ज्वारीची पेरणी करण्याचा प्रघातच आहे. चाराही कसदार मिळत असल्याने अनेक शेतकरी मका, बाजरीऐवजी ज्वारीला पसंती देतात. दाण्यांचा दर्जाही शुभ्र, टपोरा आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादन येईल. दरही बऱ्यापैकी मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...