agriculture news in marathi, Jowar plant do not have grains in Sangli | Agrowon

सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले नाहीत
अभिजित डाके
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप केलेल्या ज्वारीच्या बियाण्याला धाटे आली; मात्र, कणसे भरलीच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली कृषी विभागाने सुरू केल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप केलेल्या ज्वारीच्या बियाण्याला धाटे आली; मात्र, कणसे भरलीच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली कृषी विभागाने सुरू केल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबिवल्या जातात. त्यानुसार त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या जातात. "राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान'' या योजनेखाली जिल्ह्यात ज्वारीच्या विविध नामांकित कंपण्यांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या योजनेत मिरज तालुक्‍यातील भोसे आणि करोली तसेच शिराळा तालुक्‍यातील एका गावाची निवड करण्यात आली. त्या गावात संबंधित ज्वारीचे बियाणे पेरणीसाठी मोफत दिले होते.

शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली. ज्वारीची उगवणही चांगली झाली. हळूहूळ नुसतीच त्याची वाढ झाली. केवळ धाटे शिवारात दिसू लागले. ज्वारीला कणसे आली, पण त्यामध्ये दाणेच भरले नाहीत. भोसे आणि करोली या दोन्ही गावात सुमारे ५० एकरावर अशीच परिस्थिती आहे. अशी तक्रार भोसे (ता. मिरज) तालुक्‍यातील शेतकरी सदाशिव खामकर यांनी कृषी विभागाकडे केली.

कृषी विभाग आणि नामांकित कंपनीचे अधिकारी येऊन त्याचा पंचनामाही केला. कृषी विभागाने संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र पुढील कारवाई निवडणुकीच्या जाळ्यात अडकली असल्याने कारवाई कधी होणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...