agriculture news in marathi, July 24 for the Kharif crop insurance in Solapur | Agrowon

सोलापुरात खरीप पीकविम्यासाठी २४ जुलैची मुदत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

सोलापूर  : यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना जाहीर झाली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक अाहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. संबंधित बॅंकेकडे शेतकऱ्यांनी २४ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले. 

सोलापूर  : यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना जाहीर झाली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक अाहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. संबंधित बॅंकेकडे शेतकऱ्यांनी २४ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले. 

सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता खरीप हंगामासाठी प्रतिहेक्‍टरी संरक्षित रकमेच्या दोन टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. 

प्रामुख्याने ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, भुईमूग, सूर्यफूल, मूग, उडीद, कापूस, कांदा आणि भात या पिकांचा योजनेत समावेश आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्‍चित करण्यात आला आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज राष्ट्रीयकृत बॅंक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे स्वीकारले जातील. याकरिता ७/१२ उतारा, अधिसूचित पिकाची पेरणी केलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, बॅंक खात्याचा तपशील देणे शेतकऱ्यासाठी बंधनकारक आहे. 

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि., सोलापूर यांचे अधिनस्त कार्यरत असलेल्या शाखांशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, संबंधित तालुका कृषी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन बिराजदार यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
अमरावती जिल्हा परिषद करणार जलजागृतीअमरावती ः रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
लिची फळपिकाच्या जातीलालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
यवतमाळ जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यायवतमाळ : पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील...
दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदीजी शाळकरी मुले आठवड्यातून किमान तीन वेळा दुपारी...
सांगलीतील दुष्काळी पट्टा पावसाच्या...सांगली : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे....
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत चार-...
नातेपुते-पंढरपूर मार्गावर वाहतुकीत तीन...सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि...
पीककर्ज वाटप ७० वरून  ४५.५० टक्क्यांवर...मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजना राबवूनही...
अमरावती जिल्ह्यात ५२ लाखांच्या बियाणे...अमरावती ः खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी...
बीड जिल्ह्यातील १८ चारा छावण्यांवर...मुंबई  ः शासकीय पथकाने केलेल्या तपासणीत...
अमरावतीत बियाण्यांची जादा दराने विक्रीअमरावती  ः जिल्ह्यात एका कंपनीच्या कापूस...
वसारी येथे ‘स्वाभिमानी’ने केली दगड पेरणीवाशीम : खरीप हंगाम दारात आलेला असतानाही...
संघाच्या दूध खरेदीची मर्यादा आता वीस...वर्धा ः दूध संघाला केवळ ११ हजार लिटर खरेदीची...
वाशीममध्ये सरासरी १६.८२ टक्के पीक...वाशीम ः  जिल्ह्यात २०१९-२० या वर्षाच्या खरीप...
जळगावच्या आरोग्य अधिकाऱ्याची चौकशी करू...मुंबई ः राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत...
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा धार फाटा येथे...गोजेगाव, जि. हिंगोली : बॅंका पीक कर्ज...
वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव...मुंबई ः  वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न...
जळगावात कोथिंबीर २५०० ते ६००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...