ज्वारी
ज्वारी

नगरला ज्वारी १५५० ते २१५१ रुपये

नगर ः नगर बाजार समितीत गत सप्ताहात ज्वारीची ८८४ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला १५५० ते २१५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गहू, चिंच, गूळ डागाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन ज्वारी हाती आल्याने आवकेत अशीच वाढ होत राहील, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यामध्ये यंदा सुमारे पाच लाख हेक्‍टरच्या जवळपास ज्वारीचे पीक घेतले गेले. याशिवाय शेजारच्या औरंगाबाद, बीड, सोलापूर जिल्ह्यांतूनही ज्वारी विक्रीला येते. बाजार समितीत बाजरीची ४९ क्विटलची आवक होऊन ११०० रुपये दर मिळाला. तुरीची २५३ क्विंटलची आवक होऊन ३५००ते ३८०० रुपये तर हरभऱ्याची ३३१ क्विंटलची आवक होऊन ३००० ते ३६२५ रुपये दर मिळाला. मुगाची ५० क्‍लिंटलची आवक होऊन ४५०० रुपये, लाल मिरचीची २५४ क्विंटलची आवक होऊन ६४६९ ते ७५१७, गव्हाची १७१२ क्विंटलची आवक होऊन १६०० ते १८०० रुपये दर मिळाला. गूळ डागाची सहा हजार ७१ क्विंटलची आवक झाली. गूळ डागाला २३५० ते ३२०० रुपये दर मिळाला. उडदाची बारा क्विंटलची आवक होऊन ३३०० रुपये, तर हरभऱ्याची ३३१ क्विंटल आवक होऊन ३००० ते ३६२५ रुपये दर मिळाला. हरभरा, ज्वारीची अजून आवक वाढेल, असे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. टोमॅटोची ३४१ क्विंटलची आवक होऊन २०० ते ५०० रुपये सरासरी दर मिळाला. वांग्यांची ७३ क्विंटल आवक होऊन २०० ते ९०० रुपये, फ्लाॅवरची ११२ क्विंटल आवक होऊन २०० ते ८०० रुपये, कोबीची ९५ क्विंटलची आवक होऊन १०० ते ४०० रुपये, काकडीची १४५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२०० रुपये, भंडीची ९१ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते तीन हजार, बटाट्याची ३०७ क्विंटलची आवक होऊन ४०० ते नऊशे, हिरव्या मिरचीची ९०३ क्विंटलची आवक होऊन ३००० ते ५८०० रुपये तर सिमला मिरचीचीही ११० क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते आडीच हजार रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com