agriculture news in Marathi, jwar at 1550 to 2151 rupees in Nagar, Maharashtra | Agrowon

नगरला ज्वारी १५५० ते २१५१ रुपये
सूर्यकांत नेटके
मंगळवार, 6 मार्च 2018

नगर ः नगर बाजार समितीत गत सप्ताहात ज्वारीची ८८४ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला १५५० ते २१५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गहू, चिंच, गूळ डागाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन ज्वारी हाती आल्याने आवकेत अशीच वाढ होत राहील, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर ः नगर बाजार समितीत गत सप्ताहात ज्वारीची ८८४ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला १५५० ते २१५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गहू, चिंच, गूळ डागाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन ज्वारी हाती आल्याने आवकेत अशीच वाढ होत राहील, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा सुमारे पाच लाख हेक्‍टरच्या जवळपास ज्वारीचे पीक घेतले गेले. याशिवाय शेजारच्या औरंगाबाद, बीड, सोलापूर जिल्ह्यांतूनही ज्वारी विक्रीला येते. बाजार समितीत बाजरीची ४९ क्विटलची आवक होऊन ११०० रुपये दर मिळाला. तुरीची २५३ क्विंटलची आवक होऊन ३५००ते ३८०० रुपये तर हरभऱ्याची ३३१ क्विंटलची आवक होऊन ३००० ते ३६२५ रुपये दर मिळाला. मुगाची ५० क्‍लिंटलची आवक होऊन ४५०० रुपये, लाल मिरचीची २५४ क्विंटलची आवक होऊन ६४६९ ते ७५१७, गव्हाची १७१२ क्विंटलची आवक होऊन १६०० ते १८०० रुपये दर मिळाला.

गूळ डागाची सहा हजार ७१ क्विंटलची आवक झाली. गूळ डागाला २३५० ते ३२०० रुपये दर मिळाला. उडदाची बारा क्विंटलची आवक होऊन ३३०० रुपये, तर हरभऱ्याची ३३१ क्विंटल आवक होऊन ३००० ते ३६२५ रुपये दर मिळाला. हरभरा, ज्वारीची अजून आवक वाढेल, असे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

टोमॅटोची ३४१ क्विंटलची आवक होऊन २०० ते ५०० रुपये सरासरी दर मिळाला. वांग्यांची ७३ क्विंटल आवक होऊन २०० ते ९०० रुपये, फ्लाॅवरची ११२ क्विंटल आवक होऊन २०० ते ८०० रुपये, कोबीची ९५ क्विंटलची आवक होऊन १०० ते ४०० रुपये, काकडीची १४५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२०० रुपये, भंडीची ९१ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते तीन हजार, बटाट्याची ३०७ क्विंटलची आवक होऊन ४०० ते नऊशे, हिरव्या मिरचीची ९०३ क्विंटलची आवक होऊन ३००० ते ५८०० रुपये तर सिमला मिरचीचीही ११० क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते आडीच हजार रुपयांचा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावमध्ये जांभूळ ६००० ते ८५०० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात ढोबळी मिरची, फ्लॉवर, मेथी...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कोबी,...पुणे  : पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या...
सातत्यपूर्ण तेजीनंतर बाजारात नरमाई शक्यमागील दोन आठवड्यांत ब्रॉयलर्स पक्ष्यांना उच्चांकी...
जळगाव येथे चवळी शेंगा ३५०० रुपये क्विंटलजळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
प्रवीस कृषी रसायनाची सीआयबी रजिस्टर्ड...कोल्हापूर : येथील प्रवीस कृषी रसायन या कंपनीने...
कळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक...नागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३)...
औरंगाबाद येथे कारले १५०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात ३०...पुणे  ः शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर...
थंडाव्यामुळे ब्रॉयलरच्या खपात सुधारणा,...ब्रॉयलर कोंबड्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या...
परभणी शेवगा ३५०० ते ४५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-...
सांगलीत हळद ६००० ते ११००० रुपये क्विंटल सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २९)...
वर्षातील उच्चांकी पातळीवरून ब्रॉयलर्स...गेल्या आठवड्यात उच्चांकी भावपातळीवरून ब्रॉयलर्सचा...
पुण्यात कारली, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...