नागपुरात ज्वारीचे दर १८०० ते २२०० रुपयांवर

ज्वारी
ज्वारी

नागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत ज्वारीची आवक जेमतेम असली तरी दर गेल्या आठवड्यापासून स्थिर असल्याचे चित्र आहे. ज्वारीची आवक १३ ते ५० क्‍विंटलची रोजची असून ज्वारीचे दर १८०० ते २२०० रुपये क्‍विंटलचे आहेत. ज्वारीसोबतच सरबती गव्हाचीदेखील आवक बाजारात होत असून २५०० ते २८०० रुपये क्‍विंटलने गव्हाचे व्यवहार होत आहेत.  गव्हाच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढीचा अनुभव आहे. ३ एप्रिल रोजी गव्हाचे दर २१०० ते २५०० रुपये क्‍विंटल होते. त्यानंतर गव्हाच्या दरात वाढ होत हे दर २५०० ते २९०० रुपयांवर पोचले. त्यानंतर २५०० ते २८००  रुपयांवर दर स्थिरावरले आहेत. सरबती गव्हाची आवक २००० क्‍विंटलच्या आसपास आहे. लुचई तांदूळाची आवक बाजारात १५० ते २०० क्‍विंटलच्या घरात आहे. २२०० ते २५०० रुपयांवर लुचई तांदूळाचे दर गेल्या पंधरवाड्यापासून स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बाजारात हरभऱ्याच्या दरात घसरणीचे चित्र आहे. ३३०० ते ३६०० रुपये क्‍विंटल असलेल्या हरभऱ्याचे दर ३२०० ते ३५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. हरभऱ्याची सरासरी आवक ४००० क्‍विंटलची आहे. तुरीच्या दरात चढउतार होत असून सरासरी दर चार हजार रुपये क्‍विंटलचा आहे. तुरीची आवक २००० ते साडेतीन हजाराची होत आहे.  गव्हाच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढीचा अनुभव आहे. ३ एप्रिल रोजी गव्हाचे दर २१०० ते २५०० रुपये क्‍विंटल होते. त्यानंतर गव्हाच्या दरात वाढ होत हे दर २५०० ते २९०० रुपयांवर पोचले. त्यानंतर २५०० ते २८०० रुपयांवर दर स्थिरावरले आहेत. सरबती गव्हाची आवक २००० क्‍विंटलच्या आसपास आहे. लुचई तांदूळाची आवक बाजारात १५० ते २०० क्‍विंटलच्या घरात आहे. २२०० ते २५०० रुपयांवर लुचई तांदूळाचे दर गेल्या पंधरवाड्यापासून स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बाजारात हरभऱ्याच्या दरात घसरणीचे चित्र आहे. ३३०० ते ३६०० रुपये क्‍विंटल असलेल्या हरभऱ्याचे दर ३२०० ते ३५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. हरभऱ्याची सरासरी आवक ४००० क्‍विंटलची आहे. तुरीच्या दरात चढउतार होत असून सरासरी दर चार हजार रुपये क्‍विंटलचा आहे. तुरीची आवक २००० ते साडेतीन हजाराची होत आहे. ३४०० ते ४१०० रुपये गेल्या आठवड्यात तूरीचा दर होता. या आठवड्यात हेच दर ३३४० ते ४०१२ रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. मूगाची ७ एप्रिल रोजीचा अपवाद वगळता इतर दिवशी आवक नोंदविली गेली नाही. सात एप्रिल रोजी २० क्‍विंटल मूगाची आवक झाली. ४२०० ते ४५०० रुपये क्‍विंटल दराने मूगाचे व्यवहार होत आहेत. सोयाबीनची २०० ते ५०० क्‍विंटल आवक असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ३२२५ ते ३७५० रुपये प्रती क्‍विंटलने गेल्या आठवड्यात सोयाबीनचे व्यवहार होत आहे. या आठवड्यात हेच दर ३३०० ते ३७५२ रुपये क्‍विंटलवर हे दर पोचले. संत्रा-मोसंबीची आवक बाजारात संत्रा, मोसंबीची आवक देखील नियमीत आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांची आवक ६०० ते ७०० क्‍विंटलची आहे. ३००० ते ४८०० रुपये क्‍विंटलचा दर गेल्या आठवड्यात संत्र्याला होता. या आठवड्यात दरात घसरण होत हे दर २५०० ते ३५०० रुपयांवर आल्याचे व्यापाऱ्यांनी सां.गितले. मोठ्या मोसंबीचे दर ३००० ते ४००० रुपये क्‍विंटल होते. त्यात वाढ होत हे दर ३००० ते ३६०० रुपयांवर पोचले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com