agriculture news in Marathi, Jyotsna Sharma says pomegranate hast-ambe bahar will benefit for bacterial blight, Maharashtra | Agrowon

‘तेल्या’पासून बचावासाठी डाळिंबाचा हस्त-आंबे बहर ठरेल फायदेशीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पुणे ः डाळिंबावर तेल्या पसरण्यासाठी पावसाळी वातावरण, आर्द्रतेचे वाढते प्रमाण, बागेची अस्वच्छता यांसारखी विविध कारणे आहेत. त्यासाठी वेळीच फवारणी, स्वच्छता करणे महत्त्वाचे आहेच; पण यावर उत्तम उपाय म्हणजे डाळिंबाचे बहर नियोजन बदलणे फायदेशीर ठरू शकते, मुख्यतः हस्त आणि आंबे बहरांचे नियोजन करावे. या कालवधीत तेल्याचे प्रमाण कमी असते, असे सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी रविवारी (ता. ७) येथे सांगितले.

पुणे ः डाळिंबावर तेल्या पसरण्यासाठी पावसाळी वातावरण, आर्द्रतेचे वाढते प्रमाण, बागेची अस्वच्छता यांसारखी विविध कारणे आहेत. त्यासाठी वेळीच फवारणी, स्वच्छता करणे महत्त्वाचे आहेच; पण यावर उत्तम उपाय म्हणजे डाळिंबाचे बहर नियोजन बदलणे फायदेशीर ठरू शकते, मुख्यतः हस्त आणि आंबे बहरांचे नियोजन करावे. या कालवधीत तेल्याचे प्रमाण कमी असते, असे सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी रविवारी (ता. ७) येथे सांगितले.

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वतीने आयोजित डाळिंब परिसंवाद ‘डाळिंबावरील तेलकट डाग रोग व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. शर्मा बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे हे होते. 

डॉ. शर्मा म्हणाल्या, की तेल्या ही डाळिंबातील मोठी समस्या बनली आहे. महाराष्ट्रासह देशभरात डाळिंबाची क्षेत्रवाढ, उत्पादनवाढ होते आहे; पण वाढत्या क्षेत्रामुळेही तेल्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुख्यतः पावसाळी वातावरणात त्याचे प्रमाण सर्वाधिक वाढते. पहिल्यांदा पानावर, नंतर खोडावर, काड्यांवर असे करत तो वाढतो. पानावर काळे, पिवळे डाग पडण्याची प्राथमिक क्रिया त्यात होते. त्यानंतर तो फळावर येतो. फळावर डाग पडल्यानंतर थेट फळे तडकण्याचे प्रमाणही यामध्ये जास्त होते. त्यासाठी लागवडीपासूनच काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

गुटीकलम, रोपे या पद्धती डाळिंब लागवडीत वापरल्या जातात. या रोपाबरोबरच तेल्या पुढे डाळिंब बागेत पसरू शकतो. पण त्याऐवजी टिश्‍यूकल्चर रोपांचा वापर वाढवावा, त्याशिवाय एकाच वाणाची लागवड न करता भगवा, गणेश यांसारख्या वेगवेगळ्या वाणांची लागवड करावी, याचाही फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. 

डॉ. शर्मा म्हणाल्या...

  • नव्या लागवडीसाठी टिश्‍यूकल्चरचा वापर करा
  • बागेची स्वच्छता सतत करत राहा
  • तेल्याग्रस्त फळे, फांद्या, काड्या बागेबाहेर काढून टाका
  • झाडाला बोर्डो मिश्रणाची पेस्ट लावणे आवश्‍यक आहे

इतर बातम्या
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...
प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲ...जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲ...
शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याबाबत...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या कृषी...
'ओखी' नुकसानग्रस्तांसाठी सव्वादोन...नाशिक  : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी...
टेंभू योजना सुरू करण्यास...सांगली : दुष्काळी भागातील महत्त्वाची असणारी टेंभू...
खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूचजळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा...
मोसंबीवर मावा चिकटा वाढलाऔरंगाबाद  : मोसंबीवर मावा व चिकटाचा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’...मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही...
विमा योजनेत हवामान केंद्रांचा घोळजळगाव ः यंदा जाहीर झालेल्या फळ पीक विमा योजनेतही...
ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारकपुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल १००० ते ३३००...राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील महिनाभरापासून...
मराठवाड्यातील दुष्काळावर ‘इस्राईल’ची...मुंबई ः अपुऱ्या आणि अनियमित पर्जन्यमानामुळे...
कृषी विद्यापीठांना तंत्रनिकेतनची समस्या...पुणे : कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कृषी...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेतीसिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक...