agriculture news in marathi, Kachargad fair starts from today | Agrowon

आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस प्रारंभ (video सुद्धा)
संतोष डुकरे 
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी समाजाचे मूळ स्थान समजल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशच्या सीमेनजीक पारी कोपार लिंगो मॉं काली कंकाली पेनठाना देवस्थानच्या यात्रेस रविवारी (ता. १७) प्रारंभ झाला. 

कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी समाजाचे मूळ स्थान समजल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशच्या सीमेनजीक पारी कोपार लिंगो मॉं काली कंकाली पेनठाना देवस्थानच्या यात्रेस रविवारी (ता. १७) प्रारंभ झाला. 

देशभरातून आदिवासी बांधव येथे दाखल होण्यास सुरवात झाली असून पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सहा लाखांहून अधिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय गोंडवाना साहित्य महासंमेलन, गोंडी संस्कृती महोत्सव आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास राज्यमंत्री अंब्रिशराव अत्राम, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे सोमवारी (ता. १८) कचारगडला भेट देणार आहेत. 

आवर्जून पहा आदिवासींचे मूळस्थान
असलेले हे कचारगड देवस्थान.. video

कचारगड (ता. सालेकसा) येथे आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा असून या गुफा परिसरात माँ काली कंकाली देवस्थान, माता जंगो आणि बाबा जंगो, शंभूसेक यांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी गोंडी संस्कृतीचे रचनाकार शंभू गौरा पहांदी पारी कुपार लिंगो, संगीत सम्राट हिरासुका पाटालीर, ३३ कोट सगापेन आणि १२ पेनाचे ७५० गणगोत, सल्ला गांगरा शक्ती यांचे वास्तव्य आहे. त्यांचा आत्मा येथे वास करतो अशी गोंडी धर्माची मान्यता व श्रद्धा आहे. ३३ कोट सगापेन या ठिकाणातून देशात पसार पावले. त्यांचे वंशज म्हणून आदिवासी समाज जन्माला आला. यामुळे सर्व देशभरातील आदिवासी भाविक माघ पौर्णिमेला आपल्या पूर्वजांच्या स्मरणात येथे येऊन महापूजा करतात.

कचारगड यात्रेत जवळपास १८ राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, पं. बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यातील आदिवासी समाजबांधव येथे दरवर्षी येतात. मध्य भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कचारगड यात्रेचा लौकिक आहे. ५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा समारोप गुरुवारी (ता. २१) होणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...