‘कादवा’ने इथेनॉल प्रकल्प रेटल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

‘कादवा’ने इथेनॉल प्रकल्प रेटल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
‘कादवा’ने इथेनॉल प्रकल्प रेटल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

लखमापूर, जि. नाशिक :  `कादवा` कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस उत्पादक सभासदांचा असलेला विरोध डावलत इथेनॉल प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. प्रकल्पाबाबत ऊस उत्पादकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा, संचालक मंडळाने चर्चेविना प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा ऊस उत्पादक सभासद आवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, सचिन बर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

बर्डे म्हणाले, ‘‘संचालक मंडळाने इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा जो अट्टाहास चालवला आहे, तो अतिशय चुकीचा व कारखान्याच्या मुळावर उठणारा आहे. प्रकल्पाला विरोध नसून त्याच्या उभारणीसाठी कारखान्याकडे पुरेसा ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध नाही. आधी कार्यक्षेत्रात चार लाख टन ऊस ऊपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यानंतरच हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घ्यावा.``

 ऊस उत्पादकांनी प्रकल्पाला संमती दिल्यास आमचा विरोध राहणार नाही. मात्र विरोध डावलून प्रकल्प उभारण्याचा अट्टाहास केल्यास या विरोधात साखर आयुक्तांकडे दाद मागू, तेथेही न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा जाधव आणि बर्डे यांनी दिला .

सर्वांना विश्‍वासात घेऊनच  निर्णय : शेटे `कादवा`चे अध्यक्ष श्रीराम शेटे म्हणाले,‘‘साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर उद्योग अडचणीत आल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाने इथेनॉलबाबत सकारात्मक धोरण अवलंबले आहे. त्यासंबंधीच्या प्रस्तावाचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेवर ठेवत त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यास सर्वानुमते हात उंचावून बहुमताने मंजुरी देण्यात आली. प्रकल्प उभारणीसाठी आवश्‍यक विविध परवानग्यांसाठी बराच कालावधी लागणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे टन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. कारखान्यास सहकार्य करावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com