परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटल

परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटल
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटल

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी (ता. २२) काकडीची २५ क्विंटल आवक होती. काकडीला १००० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक झाली. पालकास ४०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक झाली. चुक्याला १२०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते १५०० रुपये क्विंटल असे दर  मिळाले. मेथीची २० हजार जुड्या आवक झाली. मेथीला प्रतिशेकडा १५० ते २५० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाटाण्याची ८० क्विंटल आवक झाली. वाटाण्यास प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. गवारीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ६ क्विंटल आवक झाली. शेवग्याला ३५०० ते ४००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. कारल्याला २५०० ते ३५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक झाली. दोडक्याला ३५०० ते ४००० रुपये क्विंटल असे दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ५ क्विंटल आवक झाली. बीटरुमला १२०० ते २००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. मुळ्याची ४ हजार नग आवक असताना प्रतिशेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. गाजराची ४०० क्विंटल आवक झाली. त्यास ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले.

वांग्याची ३५ क्विंटल आवक झाली. वांग्याला १२०० ते २००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. टोमॅटोची ५०० क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ८०० ते १५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक झाली. ढोबळ्या मिरचीला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. फ्लॅावरची ३५ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ५०० ते १२०० रुपये क्विंटल दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक झाली. कोबीला ७०० ते १००० रुपये क्विंटल असे दर मिळाले.कांदा पातीची १५ क्विंटल आवक झाली. कांदा पातीला १२०० ते २५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.

भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. लिंबाची आवक २० क्विंटल होती. लिंबाला १२०० ते २५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com