agriculture news in marathi, kalamna market committee election as per old marketing act | Agrowon

‘कळमणा बाजार’ निवडणूक जुन्या पणन कायद्याप्रमाणेच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जानेवारी 2018

नागपूर : येथील कळमणा बाजार समितीच्या निवडणुका जुन्या प्रचलित कायद्याप्रमाणेच घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी (ता. १६) दिले. परिणामी, या बाजार समितीच्या येत्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा हक्‍क बजावता येणार नाही. हा निकाल देताना या संदर्भाने दाखल तीन विविध याचिकादेखील न्यायालयाने निकाली काढल्या.

नागपूर : येथील कळमणा बाजार समितीच्या निवडणुका जुन्या प्रचलित कायद्याप्रमाणेच घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी (ता. १६) दिले. परिणामी, या बाजार समितीच्या येत्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा हक्‍क बजावता येणार नाही. हा निकाल देताना या संदर्भाने दाखल तीन विविध याचिकादेखील न्यायालयाने निकाली काढल्या.

कळमणास्थित नागपूर बाजार समिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बाजार समितीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच सत्ताधाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर याविषयीची उत्सुकता अधिकच वाढीस लागली. तत्कालीन संचालक मंडळाचा कार्यकाळ 8 मार्च 2017 रोजी संपला. त्या वेळी तत्काळ प्रशासकाची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर मुदतवाढीसाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्यानंतर त्याआधारे संचालक मंडळास सहा महिने मुदतवाढ मिळाली. या सर्व घडामोडी एकीकडे होत असताना शासनाकडून बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया समांतर राबविली जात होती. निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट 2017 रोजी बाजार समिती मतदारांची अंतिम यादी जाहीर केली.

दरम्यान, पणन व सहकार विभागाकडून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. कळमणा बाजार समितीमध्ये पणन कायद्यातील या सुधारणांची अंमलबजावणी होण्याची शक्‍यता होती. नव्या सुधारणेनुसार शेतकऱ्यांनादेखील मतदानांचा अधिकार येथे देखील मिळण्याचे प्रस्तावित होते. परंतु येथील निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू झाल्याने कायद्यातील नव्या सुधारणा येथे लागू होत नाही, असा दावा करणारी याचिका तत्कालीन सभापती अहमदभाई कादरभाई यांच्यासह तीन संचालकांनी नागपूर खंडपीठात दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांची अंतिम यादी ऑगस्ट महिन्यातच प्रसिद्ध केल्याचा दाखला यासाठी देण्यात आला. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व सपना जोशी यांच्या खंडपीठाने हा दावा ग्राह्य मानत नागपूर बाजार समितीची निवडणूक जुन्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच घेण्याचे आदेश दिले. निवडणूक होईस्तोवर या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक कायम ठेवण्याचेही आदेशात म्हटले आहे.

बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. 31 ऑगस्ट 2017 ला जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी अंतिम केली. त्यामुळे जुन्या कायद्याप्रमाणेच ही निवडणूक व्हावी, अशी आमची मागणी होती. त्याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने आमचा मुद्दा ग्राह्य धरत निकाल दिला आहे.
- अहमदभाई कादरभाई, माजी सभापती, नागपूर बाजार समिती

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...