कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते ४९०१ रुपये 

कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते ४९०१ रुपये 
कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते ४९०१ रुपये 

नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ९) ज्वारी, तूर, गहू, तांदूळाची आवक नोंदविण्यात आली. तुरीची ३८७ क्‍विंटल आवक झाली. तुरीला प्रतिक्विंटल ४१०० ते ४९०१ रुपये दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बटाट्याची चार हजार क्‍विंटलपेक्षा जास्त आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कळमणा बाजार समिती नव्या शेतमालाची आवक नसल्याने भाजीपाला वगळता इतर शेतमालाची आवक कमी झाल्याचे सांगण्यात आले. 

ज्वारीची १० क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. २००० ते २२०० रुपये क्‍विंटलने ज्वारीचे व्यवहार झाले. सरबती गव्हाचे व्यवहार २६०० ते २९०० रुपये क्‍विंटलने झाले असून ८१ क्‍विंटलची आवक नोंदविली गेली. लुचई तांदळाची आवक ३०० क्‍विंटलच्या घरात होती. २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचा दर तांदूळाला मिळाला. ३८५० ते ४४५१ रुपये क्‍विंटलने व्यवहार झालेल्या हरभऱ्याची अवघी ८९ क्‍विंटल आवक झाली. 

मूगाची जेमतेम चार क्‍विंटल आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटलने मूग विकल्या गेला. सोयाबीनची १३३७ क्‍विंटल आवक झाली असून ३१०० ते ३४३५ रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले. लसून १००० ते ३००० रुपये क्‍विंटल आणि आवक ५६८ क्‍विंटल झाली. आल्याची आवक १८०६ क्‍विंटल आणि दर ३००० ते ५००० रुपये क्‍विंटल होते. 

मोसंबीची आवक  मोसंबीला २००० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाले. १००० क्‍विंटल मोसंबीची आवक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. केळीची ११ क्‍विंटल आवक होऊन दर ४५० ते ५५० रुपये क्‍विंटल होते. डाळिंबाचे दर १००० ते ५००० रुपये क्‍विंटल तर आवक १२८७ क्‍विंटल झाली. चिकू १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल आणि आवक ३९२ क्‍विंटल नोंदविली गेली. बटाट्याची सर्वाधिक ४३६४ क्‍विंटल आवक आणि दर ७०० ते १४०० रुपये क्‍विंटल झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com