agriculture news in Marathi, Kalamna market in tur per quintal Rs 4100 to 4901 | Agrowon

कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते ४९०१ रुपये 
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जानेवारी 2019

नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ९) ज्वारी, तूर, गहू, तांदूळाची आवक नोंदविण्यात आली. तुरीची ३८७ क्‍विंटल आवक झाली. तुरीला प्रतिक्विंटल ४१०० ते ४९०१ रुपये दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बटाट्याची चार हजार क्‍विंटलपेक्षा जास्त आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कळमणा बाजार समिती नव्या शेतमालाची आवक नसल्याने भाजीपाला वगळता इतर शेतमालाची आवक कमी झाल्याचे सांगण्यात आले. 

नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ९) ज्वारी, तूर, गहू, तांदूळाची आवक नोंदविण्यात आली. तुरीची ३८७ क्‍विंटल आवक झाली. तुरीला प्रतिक्विंटल ४१०० ते ४९०१ रुपये दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बटाट्याची चार हजार क्‍विंटलपेक्षा जास्त आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कळमणा बाजार समिती नव्या शेतमालाची आवक नसल्याने भाजीपाला वगळता इतर शेतमालाची आवक कमी झाल्याचे सांगण्यात आले. 

ज्वारीची १० क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. २००० ते २२०० रुपये क्‍विंटलने ज्वारीचे व्यवहार झाले. सरबती गव्हाचे व्यवहार २६०० ते २९०० रुपये क्‍विंटलने झाले असून ८१ क्‍विंटलची आवक नोंदविली गेली. लुचई तांदळाची आवक ३०० क्‍विंटलच्या घरात होती. २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचा दर तांदूळाला मिळाला. ३८५० ते ४४५१ रुपये क्‍विंटलने व्यवहार झालेल्या हरभऱ्याची अवघी ८९ क्‍विंटल आवक झाली. 

मूगाची जेमतेम चार क्‍विंटल आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटलने मूग विकल्या गेला. सोयाबीनची १३३७ क्‍विंटल आवक झाली असून ३१०० ते ३४३५ रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले. लसून १००० ते ३००० रुपये क्‍विंटल आणि आवक ५६८ क्‍विंटल झाली. आल्याची आवक १८०६ क्‍विंटल आणि दर ३००० ते ५००० रुपये क्‍विंटल होते. 

मोसंबीची आवक 
मोसंबीला २००० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाले. १००० क्‍विंटल मोसंबीची आवक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. केळीची ११ क्‍विंटल आवक होऊन दर ४५० ते ५५० रुपये क्‍विंटल होते. डाळिंबाचे दर १००० ते ५००० रुपये क्‍विंटल तर आवक १२८७ क्‍विंटल झाली. चिकू १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल आणि आवक ३९२ क्‍विंटल नोंदविली गेली. बटाट्याची सर्वाधिक ४३६४ क्‍विंटल आवक आणि दर ७०० ते १४०० रुपये क्‍विंटल झाली.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...