agriculture news in marathi, Kalejale 'Chevanti' form of Kalejale | Agrowon

कळीतच कोमेजले ‘शेवंतीचे’ अागार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नगर ः नगर व पारनेर तालुक्‍यातील अनेक गावांत फुलशेती केली जाते. मात्र, यंदा दुष्काळाचा गंभीर फटका फुलशेतीला बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाणी नसल्याने शेवंतीचे प्लॉट सोडून दिले आहेत. त्यामुळे ‘कळी’ उमलण्याआधीच शेवतीचे आगार कोमेजले आहे. पाऊस नसल्याने पाण्याअभावी शेवंतीचे आगार म्हणून ओळख असलेल्या दोन्ही तालुक्‍यांतील शेती धोक्‍यात आली आहे.

नगर ः नगर व पारनेर तालुक्‍यातील अनेक गावांत फुलशेती केली जाते. मात्र, यंदा दुष्काळाचा गंभीर फटका फुलशेतीला बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाणी नसल्याने शेवंतीचे प्लॉट सोडून दिले आहेत. त्यामुळे ‘कळी’ उमलण्याआधीच शेवतीचे आगार कोमेजले आहे. पाऊस नसल्याने पाण्याअभावी शेवंतीचे आगार म्हणून ओळख असलेल्या दोन्ही तालुक्‍यांतील शेती धोक्‍यात आली आहे.

गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीत फुलांना विषेश मागणी असते. नगर व पारनेर या दोन तालुक्‍यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलशेती पिकवतात. नगर तालुक्‍यातील कामरगाव, भोरवाडी, चास, भोयरेपठार, पिंपळगाव कौडा, अकोळनेर, जाधववाडी, हिवरेबाजार, पारनेर तालुक्‍यातील रायतळे, वाळवणे, सुपे, राळेगण सिद्धी, हंगे, ही शेवंतीच्या फुलशेतीची अागार आहेत.

यावर्षी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी बंगळूर, पुणे, थेऊर या भागातून चढ्या भावाने शेवंतीची रोपे आणून तर काहींनी पारंपरिक काशीची (मुळी) विक्रमी लागवड केली. मात्र, जुलै पासून पावसाने दडी मारल्याने या फुलशेतीला मोठा फटका बसून शेवंती फुलण्या आधीच कळीतच कोमेजून गेल्याने फुलशेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. राजा, रतलाम व पारंपरिक काशीची (मुळी ) लागवड फेब्रुवारीच्या मध्यावर केली जाते. याला एकरी ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च येतो. या पिकास ९ महिने लागतात. तर हायब्रिड (संकरित) या वाणाची लागवड मार्चमध्ये केली जाते.

या संकरित (पेपर व्हाइट) टी रोपे बंगळूर, पुणे, थेऊर या भागांतून प्रतिरोप तीन रुपये प्रमाणे विकत आणून लावली जातात. यासाठी एकरी सत्तर हजार रुपये खर्च येतो. पाच महिन्यांनंतर या रोपांना कळ्या व फुले येण्यास सुरवात होते. पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनी आशेपोटी टॅंकरचे पाणी घालून ही रोपे जगवली. मात्र, मालाची प्रत आणि अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने व खर्च परवडत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी या शेवंती फुलांचे प्लॉट सोडू दिले आहेत.

दसरा, दिवाळीच्या सुमारास राज्यातील नागपूर दिल्ली, पुणे, ठाणे, मंबई, दिल्ली येथील फुलाचे व्यापारी आगदी बांधावर येऊन फुले खरेदी करायची. या वर्षी पाऊस नसल्याने फुलांचे व्यापारी या भागात फिरकलेच नाहीत. त्यामुळे येईल त्या भावात सध्या बाजारात फुले विकावी लागतात.
- संदीप कातोरे, उत्पादक शेतकरी, कामरगाव, ता. नगर

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...