कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवक

कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवक
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवक

नागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक आवक कळमणा बाजार समितीत आठवडाभरात झाली. बटाट्याची आठवडाभरात २० हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. डाळिंबाचीदेखील वाढती आवक होती.

गेल्या पंधरवड्यापासून इतर शेतमालाच्या तुलनेत बाजारात बटाट्याची चढी आवक आहे. ६ ऑगस्ट रोजी २१०७ क्‍विंटल तर त्यानंतर दररोज सरासरी ३ हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक बाजारात झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नागपूर जिल्हा हा मध्य प्रदेश सीमेवर असल्याने त्या भागात बटाटा उत्पादन घेतले जाते. त्यामुळे ही आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. १२०० ते १६०० असा दर असलेल्या बटाट्याचे दरातही आता काही अंशी तेजी आली. त्यानुसार दर १४०० ते १७०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. डाळिंबाचीदेखील वाढत आवक आहे.

२५०० क्‍विंटलची सरासरी डाळिंबाची रोजची आवक होत आहे. डाळिंबाला कमीत कमी १५०० तर जास्तीत जास्त ५००० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. कांद्याचीदेखील रोजची २००० क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक आहे. लाल कांद्याचे व्यवहार १००० ते १४०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. पांढरा कांदा ९०० ते १३०० रुपये क्‍विंटल असून, सरासरी आवक १००० क्‍विंटलची आहे. लसणाचे दर ६०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचे आहेत. लसूण सरासरी आवक ५०० क्‍विंटलची असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजारात आल्याचे दरही वधारले असून, कमीतकमी २००० तर जास्तीत जास्त ६ हजार रुपये क्‍विंटलने आल्याचे व्यवहार होत आहेत. आल्याची आवक ६०० ते ७०० क्‍विंटलची रोजची आहे. ८०० ते १२०० रुपये क्‍विंटलने टोमॅटोचे व्यवहार होत असून, टोमॅटोची आवक १५० क्‍विंटल इतकी आहे. चवळी शेंगाच्या दरात काही अंशी तेजी आली आहे. सुरवातीला १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर असलेल्या चवळी शेंगाचे दर २००० ते ३००० रुपये क्‍विंटलवर पोचले. चवळी शेंगाची आवक १५० क्‍विंटलची आहे. भेंडीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली. भेंडीचे दर सुरवातीला १४०० ते १८०० रुपये क्‍विंटलच होते. हे दर १८०० ते २५०० रुपये क्‍विंटलवर पोचले होते.

हरभरा, तुरीचीदेखील आवक बाजारात हरभऱ्याची ७०० ते ८०० क्‍विंटल आणि तुरीची १९६ ते २०० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. तूर ३४०० ते ३८०० रुपये क्‍विंटल आणि हरभऱ्याचे व्यवहार ३६०० ते ४१०० रुपये क्‍विंटलने होत असल्याचे सांगण्यात आले. लुचई तांदूळ २२०० ते २५०० रुपये क्‍विंटल असून, आवक २५ क्‍विंटलची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com