agriculture news in marathi, Kandy cold cuts banana in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात केळीला थंडीचा फटका
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

जळगाव : डिसेंबरसह या महिन्यात केळीला प्रतिकूल ठरणारी थंडी राहील्याने सुमारे २५ हजार हेक्‍टरवरील पिकाला जबर फटका बसला आहे. केळीचे आगार असलेल्या रावेरात केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी नुकतीच नुकसानीसंबंधी पाहणी केली. 

जळगाव : डिसेंबरसह या महिन्यात केळीला प्रतिकूल ठरणारी थंडी राहील्याने सुमारे २५ हजार हेक्‍टरवरील पिकाला जबर फटका बसला आहे. केळीचे आगार असलेल्या रावेरात केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी नुकतीच नुकसानीसंबंधी पाहणी केली. 

एक ते तीन महिन्यांच्या केळी बागांमध्ये पाने काळी, पिवळी पडली असून, एक महिन्याची रोपे पुरती पिवळी पडून वाया गेली आहेत. अशा लहान केळी बागेत नांग्या भराव्या लागतील, अशी स्थिती आहे. चोपडा व शिरपूर (जि. धुळे) तालुक्‍यात ही समस्या तापी काठावरील गावांमध्ये अधिक आहे. रावेरात निसवणीवरील केळी बागांमध्ये घड अडकणे, आखूड केळीची समस्या दिसून आली आहे. रावेरातील चिनावल, वाघोदा, सावदा व परिसरात तज्ज्ञांनी नुकतीच पाहणी केली असून, करपा रोगामुळे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

तज्ज्ञांनी नुकसानीचे क्षेत्र किती असेल, असे स्पष्टपणे सांगितले नसले, तरी रावेरमधील केळीखालील कमाल क्षेत्राला थंडीचा फटका बसल्याची पुष्टी दिली. पाहणी करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ के. बी. पवार यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत कृषी विभागातील अधिकारी होते. तापमान नियंत्रणासाठी केळीला रात्री किंवा पहाटे सिंचन करा, केळीभोवती वारा अवरोधक असावेत, रात्री केळीभोवती शेकोट्या किंवा धूर करा, असे काही सोपे उपाय तज्ज्ञांनी सुचविले. ज्या बागांमध्ये आच्छादन आहे व करपा नियंत्रणासंबंधी खते व पाणी व्यवस्थापन केले, त्या बागांमध्ये करपा रोगाला अनेक शेतकऱ्यांनी थोपविल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

रावेरात सुमारे १५ ते १७ हजार हेक्‍टर, मुक्ताईनगर व यावलमध्ये सहा हजार हेक्‍टर आणि चोपडा व शिरपूर आणि शहादा (जि. नंदुरबार) मधील सुमारे चार हजार हेक्‍टवरील केळीवर करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले जात आहे. 

करपा निर्मूलन कार्यक्रम राबवा
जळगाव जिल्ह्यात केळीवरील करपा नियंत्रणासाठी शासनाच्या कृषी विभागातर्फे २०१५ पर्यंत शेतकऱ्यांना निविष्ठांचे ९० टक्के अनुदानावर वितरण केले जात होते. २० ते २२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर या संदर्भातील कार्यक्रम राबविणे शक्‍य व्हायचे. परंतु हा कार्यक्रम शासनाने बंद केला असून, यामुळे शेतकरी संयुक्तपणे करपा निर्मूलन मोहीम राबवित नसल्याचे समोर आल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...