agriculture news in marathi, The Karapa on banana control collapsed due to lack of funds | Agrowon

निधीअभावी केळीवरील करपा नियंत्रण कोलमडले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्ह्यात केळीवर करपा रोपाचा प्रकोप दरवर्षी सप्टेंबरअखेरीस होतो. मात्र, शासनाकडून जिल्हा परिषदेला त्यावरील नियंत्रणासाठीचे अनुदान दोन वर्षांपासून मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अधिक निधी आणण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केला असून, तो लवकरच शासनाकडे सादर केला जाणार आहे.

जळगाव : जिल्ह्यात केळीवर करपा रोपाचा प्रकोप दरवर्षी सप्टेंबरअखेरीस होतो. मात्र, शासनाकडून जिल्हा परिषदेला त्यावरील नियंत्रणासाठीचे अनुदान दोन वर्षांपासून मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अधिक निधी आणण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केला असून, तो लवकरच शासनाकडे सादर केला जाणार आहे.

राज्य शासन कृषी विभागाकडून ९० टक्के अनुदानावर कीड व बुरशीनाशके दिली जात होती. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या आदेशानुसार ही योजना सुरू झाली. त्यासाठी मागील वर्षी व यंदाही अनुदान मिळालेले नाही. चार हजार रुपयांची कीडनाशके, बुरशीनाशके शेतकरी यातून घेऊ शकत होते. रावेर व यावलमध्ये करपा निर्मूलनाबाबतचे एकात्मिक काम या योजनेमुळे प्रभावीपणे सुरू झाले होते. एक हेक्‍टरसाठी निविष्ठांचा वापर व्हायचा. सहा हजार रुपये हेक्‍टरी खर्च करपा निर्मूलनासंबंधी शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. औषधे महागल्याने अलीकडे हा खर्च आणखी वाढला आहे.  

जिल्हा परिषदेला २०१६ मध्ये दोन लाख ५४ हजार रुपये अनुदान मिळाले होते. ५० टक्के अनुदानावर या योजनेतून जवळपास ४०० लाभार्थींना अनुदान दिले होते. जिल्ह्यातील केळी उत्पादकांची संख्या जवळपास ३० हजारपेक्षा अधिक असून, त्या दृष्टीने ही मदत कमी आहे. अनेक शेतकरी इच्छा असूनही या योजनेत सहभागी झाले नाहीत. जिल्हा परिषदेला मागील वर्षी व यंदाही केळी करपा निर्मूलन कार्यक्रमाबाबतचे अनुदान मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, असे सांगण्यात आले.

९० टक्के अनुदानाची योजना आणावी. अधिक निधी द्यावा, अशा मागणीचा
ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने केला आहे. केळीवरील करपा दूर झाला
तर उत्पादन व दर्जा वाढेल, असे कृषी समितीचे सभापती नंदकिशोर महाजन यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...