agriculture news in marathi, Karnartaka Ahead of Maharashtra in Tur procurement | Agrowon

तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र कर्नाटकपेक्षा खूप पिछाडीवर पडला आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात तूर लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत २८.५ टक्के कमी आहे. तरीही या राज्याने १६ मार्चपर्यंत महाराष्ट्रापेक्षा सुमारे ३८ टक्के अधिक तूर खरेदी केली आहे. तसेच कर्नाटक सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तुरीच्या किमान आधारभूत किमतीवर आपल्या तिजोरीतून बोनस दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुलनेत तिथल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५५० रुपये अधिक दर मिळाला आहे. 

पुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र कर्नाटकपेक्षा खूप पिछाडीवर पडला आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात तूर लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेत २८.५ टक्के कमी आहे. तरीही या राज्याने १६ मार्चपर्यंत महाराष्ट्रापेक्षा सुमारे ३८ टक्के अधिक तूर खरेदी केली आहे. तसेच कर्नाटक सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तुरीच्या किमान आधारभूत किमतीवर आपल्या तिजोरीतून बोनस दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुलनेत तिथल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५५० रुपये अधिक दर मिळाला आहे. 

कर्नाटक सरकारने २. ६१ लाख शेतकऱ्यांकडून एकूण सुमारे १७.४ कोटी रुपयांची तूर खरेदी केली आहे. तर महाराष्ट्रात मात्र सुमारे एक लाख शेतकऱ्यांकडून सुमारे ६.६७ कोटी रुपयांची तूर खरेदी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात सरासरी १० क्विंटल उत्पादकतेचा निकष लावल्यामुळे एका शेतकऱ्याकडील केवळ २५ टक्केच तूर सरकारी खरेदीच्या प्रक्रियेत जाण्याची शक्यता आहे. पंरतु कर्नाटकात मात्र २० क्विंटलचा निकष लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार आहे. एकूणच तुरीचा दर, खरेदीचे प्रमाण आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या या तिन्ही निकषांवर कर्नाटकने महाराष्ट्रावर मोठी आघाडी घेतली आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे तुरीला बोनस देण्याचा आणि खरेदी वेगात करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका केली जात आहे. परंतु गेल्या वर्षीही कर्नाटकची कामगिरी महाराष्ट्राच्या तुलनेत चागंली होती. महाराष्ट्रातही आगामी वर्षात विधानसभा निवडणुका आहेत. मग राजकीय हेतूने का होईना तूर खरेदीच्या बाबतीत कामगिरीत सुधारणा का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

तूर खरेदी प्रमाण

 • कर्नाटक - ३ लाख १९ हजार २१३ टन
 • महाराष्ट्र - १ लाख २२ हजार ४५३ टन
 • कर्नाटकची तूर खरेदी महाराष्ट्रापेक्षा १ लाख ९६ हजार ७६० टन अधिक.
 • महाराष्ट्राच्या तुलनेत ३८.२४ टक्के अधिक तूर खरेदी.

तूर आधारभूत किमतीवर बोनस

 • २०१७-१८ हंगाम. कर्नाटकचा बोनस ः ५५० रुपये
 • २०१७-१८ हंगाम. महाराष्ट्राचा बोनस ः शून्य रुपये
 • २०१६-१७ हंगाम. कर्नाटकचा बोनस ः ४५० रुपये
 • २०१६-१७ हंगाम. महाराष्ट्राचा बोनसल ः शून्य रुपये

तूर आधारभूत किंमत (प्रतिक्विंटल)

 • २०१७-१८ हंगाम. कर्नाटक ः ६००० रुपये
 • २०१७-१८ हंगाम. महाराष्ट्र ः ५४५० रुपये
 • २०१६-१७ हंगाम. कर्नाटक ः ५५०० रुपये
 • २०१६-१७ हंगाम. महाराष्ट्र ः ५०५० रुपये

तूर खरेदी लाभार्थी शेतकरी (२०१७-१८ हंगाम)

 • कर्नाटक - २ लाख ६१ हजार ५०७
 • महाराष्ट्र - १ लाख १ हजार ८७६

शेतकऱ्यांकडून एकूण किती किमतीची तूर खरेदी केली?

 • कर्नाटक - १७ कोटी ३९ लाख ७१ हजार ५५१ रुपये
 • महाराष्ट्र - ६ कोटी ६७ लाख ३७ हजार १०० रुपये

लागवड (२०१७-१८ हंगाम)

 • कर्नाटक - ८.८३ लाख हेक्टर
 • महाराष्ट्र - १२.३० लाख हेक्टर
 • कर्नाटकात महाराष्ट्राच्या तुलनेत २८.५ टक्के कमी लागवड क्षेत्र.

-------
तूर खरेदी उत्पादकता निकष

 • कर्नाटक - २० क्विंटल
 • महाराष्ट्र - १० क्विंटल 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...