कर्नाटकमध्ये आज मतदान

कर्नाटकमध्ये आज मतदान
कर्नाटकमध्ये आज मतदान

बंगळूर : मागील तीन महिन्यांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेली प्रचाराची धुळवड गुरुवारी सायंकाळी थांबल्यानंतर आता आज (ता.१२) रोजी कन्नड जनता मतदानाचा हक्क बजावणार आहे. येथे खरी लढत ही भाजप आणि कॉंग्रेसमध्ये असली तरीसुद्धा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) रूपाने तिसरा खेळाडूही मैदानात उतरला आहे. ‘जेडीएस’च राज्यात किंगमेकर ठरू शकतो, अशी शक्‍यता बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याखेपेस मतदारांना मोबाईल ऍपद्वारे मतदान केंद्रांवरील माहिती कळू शकेल. यंदा प्रथमच अशा प्रकारची उपाययोजना करण्यात आली आहे. १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.  थेट रणांगणात ४.९६ कोटी  :  मतदार २.५२ कोटी  :  पुरुष मतदार २.४४ कोटी  :  महिला मतदार ४ हजार ५५२:    तृतीयपंथी उमेदवार २ हजार ६०० :   रिंगणातील उमेदवार ५५ हजार ६०० :   मतदान केंद्रे ३.५ लाख  :  तैनात कर्मचारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com