agriculture news in Marathi, Karnatka election dates declare, Maharashtra | Agrowon

कर्नाटक निवडणुकीचे बिगुल वाजले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

भाजप हा ‘सुपर निवडणूक आयोग’ बनला आहे. मालवीय यांच्या वक्तव्यामुळे आयोगाच्या विश्‍वासार्हतेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त या प्रकाराबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांना नोटीस देऊन आयटी सेलविरुद्ध पोलिसांत "एफआयआर' दाखल करणार का?
- रणदीप सुरजेवाला, कॉंग्रेस प्रवक्‍ते
 

नवी दिल्ली ः दक्षिण भारताचे महाद्वार असणाऱ्या कर्नाटकमधील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा बिगुल मंगळवारी (ता. २७) वाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १२ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, १५ मे रोजी निकाल जाहीर होतील, अशी घोषणा निवडणूक आयोगाने आज केली. 

सध्याच्या २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २८ मेला संपणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २४ एप्रिलपर्यंत आहे; तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ एप्रिलपर्यंत असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. निवडणुकीत इव्हीएम मशिन बरोबरच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त ओमप्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकमधील एकूण लोकसंख्येपैकी ७२ टक्के जनता मतदार असून, राज्यात ५६ हजार मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीची अधिसूचना १७ एप्रिलला जाहीर होणार असून, १७ तारखेपासूनच अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे

उतावळा ‘भाजप' गुडघ्याला बाशिंग
आयोगाच्या अधिकृत घोषणेपूर्वीच सत्तारूढ भाजपच्या "आयटी सेल'चे प्रमुख अमित मालवीय यांनी मतदानाची तारीख जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली. हा वाद वाढताच मालवीय यांनी ट्विट डिलीट करून याचे खापर इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर फोडले. निवडणूक आयोगाने मालवीय यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देताच भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी येथे माफी मागितल्याचे समजते. 

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...