agriculture news in marathi, Karpa on banana in Aurangabad district | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यातील केळीवर करपा
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

औरंगाबाद : जिल्ह्यातील सोयगाव व कन्नड तालुक्‍यांतील केळीच्या पिकावर थंडीमुळे ''करपा'' (सिगाटोका)चा प्रादुर्भाव झाला आहे. प्रादुर्भावग्रस्त पिकाची गुरुवारी (ता. १०) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत हिमायतबाग फळ संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी पाहणी केली. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील सोयगाव व कन्नड तालुक्‍यांतील केळीच्या पिकावर थंडीमुळे ''करपा'' (सिगाटोका)चा प्रादुर्भाव झाला आहे. प्रादुर्भावग्रस्त पिकाची गुरुवारी (ता. १०) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत हिमायतबाग फळ संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी पाहणी केली. 

जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यात जवळपास पाचशे ते साडेपाचशे हेक्‍टरवर केळीचे क्षेत्र आहे. यापैकी कन्नड तालुक्‍यातील तजवळपास सव्वाशे हेक्‍टरवरील केळीच्या पिकावर थंडीमुळे करपा (सिगाटोका)चा प्रादुर्भाव झाल्याची माहिती पुढे आली. या प्रादुर्भावाची माहिती शेतकऱ्यांनी कृषी विभाग व हिमायतबाग फळसंशोधन केंद्राच्या तज्ज्ञांना दिली.

गुरुवारी केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, तालुका कृषी अधिकारी शुक्‍लेश्‍वर पेंडभाजे, मंडळ कृषी अधिकारी संदीप पवार, कृषी सहायक प्रशांत शिसोदे, महेश देसले आदींनी प्रत्यक्ष प्रादुर्भावग्रस्त केळी बागेला भेट देऊन प्रादुर्भावाची पाहणी केली. या वेळी शेतकरी सुभाष महाजन, रवींद्र महाले, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती. 

असा सुचविला उपाय 
शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी रोगाच्या नियंत्रणासाठी उपाय सुचविले. रात्रीच्या वेळी बागेमध्ये धूर करा, रात्रीच्या वेळीच बागेला पाणी द्या, प्रतिझाड १ किलो निंबोळी पेंड द्या, कांदेबागाच्या केळीच्या घडांना स्कर्टिंग बॅगने झाकावे, मॅंकोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बन्डॅझीम १० ग्रॅम किंवा सिओसी २५ ग्रॅम अधिक १०० एमएल मीनरल ऑइल प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुपारी १२ ते २ च्या दरम्यान २ टक्‍के डीएपीची फवारणी करावी, थंडीकाळात बागेभोवती कापडाचे संरक्षण करा, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...