agriculture news in Marathi, Keeping wheat inlaid in Jalgaon; Rate stable | Agrowon

जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

जळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक रखडत सुरू आहे. सध्या मळणीचा हंगाम सुरू आहे. आगाप पेरणीच्या क्षेत्रात मळणी आटोपली असून, काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी बाजारात गव्हाची पाठवणूक केली आहे. चोपडासह जळगावच्या बाजारात लोकवन गव्हाला प्रतिक्विंटल १७०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक रखडत सुरू आहे. सध्या मळणीचा हंगाम सुरू आहे. आगाप पेरणीच्या क्षेत्रात मळणी आटोपली असून, काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी बाजारात गव्हाची पाठवणूक केली आहे. चोपडासह जळगावच्या बाजारात लोकवन गव्हाला प्रतिक्विंटल १७०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. 

पाण्याच्या समस्येमुळे फक्त तापी, गिरणा नदीकाठी पेरणी झाली होती. पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत कमीच झाली. परिणामी उत्पादन कमी असणार आहे. गव्हाच्या हंगामात गारपीट किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती न आल्याने पीक व्यवस्थित हाती आले आहे. दर्जाही चांगला आहे. सध्या दर स्थिर आहेत. परंतु जळगाव येथील बाजारात पुढील १०-१२ दिवसानंतर मध्य प्रदेशातून गव्हाची आवक सुरू होईल. 

स्थानिक क्षेत्रातील आवक रखडत असली तरी बाहेरून आवक वाढणार असल्याने दरात अधिक सुधारणा अपेक्षित नसल्याचे सांगितले जात आहे. जळगाव बाजार समितीत प्रतिदिन १५० क्विंटल आवक मागील दोन-तीन दिवसांत झाली. चोपडा येथेदेखील प्रतिदिन २०० क्विंटलपर्यंत आवक झाली. पुढे आवक वाढू शकते. कारण, येत्या सात-आठ दिवसांत कमाल क्षेत्रावरील गव्हाची मळणी पूर्ण होईल. 

लोकवन प्रकारच्या गव्हाची पेरणी जिल्ह्यात अधिक झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासाठी चंदोसी, वनफोरसेवन प्रकारच्या गव्हाची पेरणीदेखील केली आहे. चंदोसी गव्हास तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहेत. त्याची कुठलीही आवक सध्या बाजारात सुरू नाही. स्थानिक व्यापारी, किरकोळ विक्रेते पंजाब व उत्तर प्रदेशातून या गव्हाचा पुरवठा करून घेतात.

केळी दर पुन्हा दबावात
उष्णता वाढत असतानाच नवती केळीचे दर मागील आठवड्याच्या अखेरीस दबावात आले. दरात क्विंटलमागे ४० रुपयांनी घसरण होऊन ते ९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. पिलबाग केळीचे दर ९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात नवती केळीला प्रतिक्विंटल कमाल १२०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. तेथे आवकेत वाढ झाली असून, मागील तीन-चार दिवस प्रतिदिन २२० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक झाली आहे. जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर व भडगाव-पाचोरा भागांत केळीची काढणी सुरू आहे. आवक स्थिर असल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...