agriculture news in Marathi, Keeping wheat inlaid in Jalgaon; Rate stable | Agrowon

जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

जळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक रखडत सुरू आहे. सध्या मळणीचा हंगाम सुरू आहे. आगाप पेरणीच्या क्षेत्रात मळणी आटोपली असून, काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी बाजारात गव्हाची पाठवणूक केली आहे. चोपडासह जळगावच्या बाजारात लोकवन गव्हाला प्रतिक्विंटल १७०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक रखडत सुरू आहे. सध्या मळणीचा हंगाम सुरू आहे. आगाप पेरणीच्या क्षेत्रात मळणी आटोपली असून, काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी बाजारात गव्हाची पाठवणूक केली आहे. चोपडासह जळगावच्या बाजारात लोकवन गव्हाला प्रतिक्विंटल १७०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. 

पाण्याच्या समस्येमुळे फक्त तापी, गिरणा नदीकाठी पेरणी झाली होती. पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत कमीच झाली. परिणामी उत्पादन कमी असणार आहे. गव्हाच्या हंगामात गारपीट किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती न आल्याने पीक व्यवस्थित हाती आले आहे. दर्जाही चांगला आहे. सध्या दर स्थिर आहेत. परंतु जळगाव येथील बाजारात पुढील १०-१२ दिवसानंतर मध्य प्रदेशातून गव्हाची आवक सुरू होईल. 

स्थानिक क्षेत्रातील आवक रखडत असली तरी बाहेरून आवक वाढणार असल्याने दरात अधिक सुधारणा अपेक्षित नसल्याचे सांगितले जात आहे. जळगाव बाजार समितीत प्रतिदिन १५० क्विंटल आवक मागील दोन-तीन दिवसांत झाली. चोपडा येथेदेखील प्रतिदिन २०० क्विंटलपर्यंत आवक झाली. पुढे आवक वाढू शकते. कारण, येत्या सात-आठ दिवसांत कमाल क्षेत्रावरील गव्हाची मळणी पूर्ण होईल. 

लोकवन प्रकारच्या गव्हाची पेरणी जिल्ह्यात अधिक झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासाठी चंदोसी, वनफोरसेवन प्रकारच्या गव्हाची पेरणीदेखील केली आहे. चंदोसी गव्हास तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहेत. त्याची कुठलीही आवक सध्या बाजारात सुरू नाही. स्थानिक व्यापारी, किरकोळ विक्रेते पंजाब व उत्तर प्रदेशातून या गव्हाचा पुरवठा करून घेतात.

केळी दर पुन्हा दबावात
उष्णता वाढत असतानाच नवती केळीचे दर मागील आठवड्याच्या अखेरीस दबावात आले. दरात क्विंटलमागे ४० रुपयांनी घसरण होऊन ते ९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. पिलबाग केळीचे दर ९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात नवती केळीला प्रतिक्विंटल कमाल १२०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. तेथे आवकेत वाढ झाली असून, मागील तीन-चार दिवस प्रतिदिन २२० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक झाली आहे. जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर व भडगाव-पाचोरा भागांत केळीची काढणी सुरू आहे. आवक स्थिर असल्याची माहिती मिळाली.

इतर बाजारभाव बातम्या
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...