agriculture news in marathi, kejriwal blaims BJP goverment for not implementing Swaminathan Committee report | Agrowon

स्वामिनाथन आयोगाचा भाजपला पडला विसर : अरविंद केजरीवाल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाबाबत भाजपला विसर पडण्याचा अाजार जडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता काबीज करणाऱ्यांना जनता धडा शिकविणार अाहे. दिल्लीतील जनतेने भाजपला सत्तेपासून दूर करीत हे दाखवून दिले, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे केले. 

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाबाबत भाजपला विसर पडण्याचा अाजार जडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता काबीज करणाऱ्यांना जनता धडा शिकविणार अाहे. दिल्लीतील जनतेने भाजपला सत्तेपासून दूर करीत हे दाखवून दिले, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे केले. 

सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीदिनी आयोजित सभेत ते बोलत होते. आम आदमी पक्षातर्फे शुक्रवारी (ता.१२) सिंदखेडराजा येथे महाराष्ट्र संकल्प सभा घेण्यात अाली. या सभेसाठी राज्याच्या विविध भागांतून पक्षाचे कार्यकर्ते आले होते. या वेळी व्यासपीठावर प्रीती शर्मा-मेनन, दिल्लीचे मंत्री राजेंद्र गौतम, पंकजा गुप्ता, देवेंद्र वानखेडे यांची उपस्थिती होती.

केजरीवाल म्हणाले, की कोरेगाव भीमा येथील घटना आरएसएस, भाजपने घडवून राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचे स्वप्न धुळीस मिळवले. दिल्लीत तीन वर्षांत तीनशे नवीन सरकारी शाळा आम्ही उभारल्या, तर इथे महाराष्ट्र सरकार शाळा बंद करायला निघाले. महाराष्ट्रातील शाळांमध्ये असंख्य अडचणी आहेत. महाराष्ट्रात तीन लाख कोटींचा बजेट, तर दिल्ली जेमतेम ४० हजार कोटींचा बजेट तरीही यांना शाळा चालवणे कठीण झाले अाहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही, ते सरकारही चालवू शकत नाही.या सभेत ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आपल्या समर्थकांसह आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांचे केजरीवाल यांनी टोपी घालून स्वागत केले.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...