केळझर, हरणबारी पाणी आरक्षणाचा तिढा सुटला

केळझर, हरणबारी पाणी आरक्षणाचा तिढा सुटला
केळझर, हरणबारी पाणी आरक्षणाचा तिढा सुटला

सटाणा, जि. नाशिक  : बागलाण तालुक्यातील जलसंधारण विभागातर्फे प्रगतीत असलेल्या साल्हेर १ वळण योजनेचे उपलब्ध पाणी केळझर चारी क्र. ८ साठी, साल्हेर २ व वाघंबा वळण योजनेचे उपलब्ध पाणी हरणबारी वाढीव उजवा कालव्यासाठी आरक्षणास मान्यता देण्यात आली आहे. तसे आदेश निघाल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील शेती सिंचनाच्या प्रलंबित योजनांना गती मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा, लोकशाही मार्गाने आंदोलने, औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तरीही दखल न घेतल्याने अखेर अंतिम विधानसभा विनंती अर्ज समितीकडे दाद मागितली होती. त्यानुसार गुरुवारी ३० ऑगस्ट रोजी विधानसभा विनंती अर्ज समितीचे अध्यक्ष आमदार आशिष देशमुख, जलसंधारण विभागचे सचिव एकनाथ डवले, जलसंपदा विभागाचे प्रकल्प सचिव बी. एम. पानसे, आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व परिसरातील शेतकरी यांची विधान भवनात बैठक पार पडली.

बागलाण तालुक्यातील साल्हेर १ व २ वाघंबा वळण योजनेचे ५३.०२ दलघफू पाणी हरणबारी वाढीव उजवा कालव्यासाठी २९.३३ दलघफू व ढोलबारे पाझर तलावासाठी ९.३० दलघफू,  केळझर वाढीव कालवा क्र. ८ साठी १४.३६ दलघफू पाणी आरक्षित करण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानुसार हा पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com