agriculture news in marathi, Kem's fund to spend by Atma in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम’चा निधी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पा (केम)चा निधी शिल्लक असल्याने तो खर्च करण्यासाठी अकोला जिल्ह्यात आत्मा यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात निर्देश देत योजनानिहाय नियोजन करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.

कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाला ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पाच्या योजना राबवण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. मार्च २०१७ पासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्प अंतिम टप्यात पोचला असून प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे.

अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पा (केम)चा निधी शिल्लक असल्याने तो खर्च करण्यासाठी अकोला जिल्ह्यात आत्मा यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात निर्देश देत योजनानिहाय नियोजन करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.

कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाला ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पाच्या योजना राबवण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. मार्च २०१७ पासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्प अंतिम टप्यात पोचला असून प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे.

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी यांच्याकडून आर्थिक मदतीतून हा प्रलल्प राबवण्यात आला. या प्रकल्पामध्ये शासकीय संस्था, सेवाभावी संस्था तसेच खाजगी कंपन्याच्या माध्यमातून काम करण्यात आले.

घटलेले कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवीत शेती व इतर उत्पन्नाच्या साधनांद्वारे शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करणे, सेंद्रिय शेती व किमान निविष्ठांची कंत्राटी शेती पद्धती अवलंबून कृषी विकास करणे, कृषी उत्पादनांची प्राथमिक प्रक्रिया, त्यांची गुणवत्तावाढ, मालाची विक्री याची सुविधा तयार करणे व इतर उपाययोजनांसाठी हा प्रकल्प राबवण्यात आला. यात बरीच कामे झाली. काही योजनांची अंमलबजावणी वादग्रस्तही ठरली.

आता हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. यात विविध योजनांसाठीचा कोट्यवधीचा निधी शिल्लक असून तो खर्च करण्यासाठी आत्मा यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. या अनुषगाने वरिष्ठ स्तरावर चर्चा विनिमय होऊन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अकोल्यात उभा राहणार ॲग्रोमॉल?
अकोला जिल्ह्यात निर्यातक्षम केळी, भाजीपाला उत्पादित करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आजवर विविध बैठका झाल्या. याचे चांगले परिणाम पुढे येऊ लागले असून, निर्यातक्षम केळी पिकवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. काही केळी निर्यातसुद्धा झाली. आता निर्यातक्षम भाजीपाला उत्पादित करण्यासाठी काम सुरू झाले आहे. आगामी काळात मिरची, भेंडी व इतर भाजीपाला निर्यात केला जाणार आहे. अकोल्यात ॲग्रोमॉल उभारला जाऊ शकतो का, याबाबत चाचपणी केली जात आहे. आत्मा, केम, कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प आदींच्या अधिकाऱ्यांना या दृष्टीने आढावा घेण्याबाबत सांगण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.

इतर बातम्या
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
‘सन्मान'च्या लाभार्थ्यांबाबत प्रशासन...गोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...