agriculture news in marathi, Khadesh faces low temperature but more humidity | Agrowon

खानदेशात तापमान कमी, पण उकाडा वाढला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

जळगाव  ः खानदेशात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी सुरू झालेली नसून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. परंतु उकाडा मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

जळगाव  ः खानदेशात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी सुरू झालेली नसून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. परंतु उकाडा मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत मागील दोन-तीन दिवसांत कुठेही दमदार पाऊस झालेला नाही. धुळे जिल्ह्यात कापडणे, जापी भागात ३ ते ४ दरम्यान जोरदार पाऊस आला. त्यात नदी, नाल्यांना पूर आला. शेतातील माती वाहून गेली. शहादा, शिरपूर भागांतही दमदार पाऊस झाला. नंतर शेतकरी बंधारे बंदिस्ती व इतर कामांमध्ये व्यस्त होते. ४ व ५ जूनदरम्यान जळगाव, पाचोरा, चोपडा, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव भागांत पाऊस झाला. वादळामुळे वृक्ष उन्मळल्याने नुकसान झाले.

अनेक भागांत मशागत पूर्णत्वास आली आहे. मात्र, मागील दोन-तीन दिवसांत पाऊस आलेला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळले आहे. यातच कृषी विभागाने पेरणी करण्यासाठी किमान ५० मिलीमीटर पाऊस हवा. त्याशिवाय सोयाबीन, कापसाची पेरणी किंवा लागवड करू नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे पेरणी झालेली नाही.

सध्या रोज सकाळपासून सुसाट वारा सुटतो. वातावरण ढगाळ असते. रात्रीही वेगवान वारे वाहतात. त्यामुळे तापमान कमी झाले आहे. काळ्या कसदार जमिनीतही ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वहंगामी कापूस, केळी व इतर भाजीपाला पिकांमध्ये शेतकरी सिंचन करीत आहेत. भारनियमन कायम असल्याने रात्रीच्या वेळेसही वीज असताना शेतकऱ्यांना शेतात सिंचनासंबंधी जावे लागत आहे. कमाल तापमान ४० खालीच आहे. सध्या केवळ पूर्वहंगामी कापूस लागवड झाली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...