agriculture news in marathi, khanapur taluka demands to flow Agrani river to the year | Agrowon

अग्रणी नदी बारमाही करा
अभिजित डाके
शुक्रवार, 18 मे 2018

सांगली ः खानापूर तालुक्‍याला वरदान ठरणारी अग्रणी नदी बारमाही करावी, अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ही नदी बारमाही झाली तर खानापूर तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न कायमचा मिटेल. मात्र, अद्यापही ही नदी बारमाही करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी लढा उभारला जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सांगली ः खानापूर तालुक्‍याला वरदान ठरणारी अग्रणी नदी बारमाही करावी, अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ही नदी बारमाही झाली तर खानापूर तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न कायमचा मिटेल. मात्र, अद्यापही ही नदी बारमाही करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी लढा उभारला जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

खानापूर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. केवळ पावसाळ्यात अग्रणी नदीला पाणी असते. मात्र, हे पाणी तालुक्‍याला अपुरे पडते. पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पावसाचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. खानापूर तालुक्‍यातील अग्रणी नदी बारमाही करावी, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली होती. त्याचा विचारदेखील लोकप्रतिनिधींनी केला. मात्र, तासगावच्या पूर्व भागात पाणी टंचाई असल्याने राजकीय नेत्यांनी २०३ कोटी रुपये खर्च करून पुनदी-विसापूर योजना सुरू केली, याचाच अर्थ, ही नदी सहजरीत्या बारमाही होत असताना आपली ‘वोट बॅंक’ कायम करण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष केले. 

दरम्यान, ही नदी कशी बारमाही होईल, याचा अभ्यास पाटबंधारे विभागाला करण्यास सांगितला गेला. त्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडले तर ही नदी बारमाही होईल, असे अभ्यासातून समोर आले. त्यासाठी भूड (ता. खानापूर) येथे टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाचव्या टप्प्यातून हे पाणी देता येईल, यावर शिक्कामोर्तब झाला. तीन वर्षांपूर्वी ही नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ, आणि काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे नदीचे पात्र विस्तारले. या नदीवर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुमारे ३६ बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदीत पाणीसाठा झाला, परिणामी पाणी प्रश्‍न मिटला. परंतु त्यांनतर ही नदी कोरडीच पडली आहे. त्यामुळे याभागातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे. यासाठी तालुक्‍यातील शेतकरीदेखील मदत करण्यास तयार आहेत. मात्र, नदी बारमाही झाली नाही तर लढा उभारू, अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.

पाइपलाइनसाठी निविदा
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्यातून अग्रणी नदी बारमाही करण्याचे नियोजन केले आहे. या टप्प्याची उंची २० मीटरने वाढवली आहे. त्यानुसार १२०० मीटर पाइपलाइन करावी लागणार आहे. त्यासाठीची निविदा काढली असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून अग्रणी नदी बारमाही करण्याचे आश्‍वासन दिले जाते आहे. मात्र, अद्यापही त्यावर मार्ग काढलेला नाही. त्यामुळे अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी आम्ही लढा उभा करू.
- संपतराव पवार, बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली.

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...