दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
ताज्या घडामोडी
सातारा : परतीचा पाऊस लांबल्यामुळे तापमानातील वाढ आणि असंतुलित रासायनिक खतांचा वापर, यामुळे मागील आठवड्यापासून खंडाळा व वाई तालुक्यांत भात पिकावर तपकिरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भात पिकात हवा खेळती राहावी यासाठी दर ५-६ ओळींनंतर भांगे पाडावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईणकर यांनी केले आहे.

खंडाळा व वाई तालुक्यांतील पश्चिम भागात भात पिकाखाली एकूण सर्वसाधारण लागवडी खालील ८२० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी खरीप हंगामात एकूण २२ गावांत ६६२ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची पुनर्लागवड झालेली होती. सध्या भात पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. परंतु परतीचा पाऊस लांबल्यामुळे, तापमानातील वाढ असंतुलित रासायनिक खताचा वापर यामुळे मागील आठवड्यापासून भात पिकावर तपकिरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रावर दळी पडणे व गोड सुवासिक वास येतो. यावर उपाय म्हणून खाचरात साचलेले पाणी काढून देणे. भात पिकांत दर ५-६ ओळी नंतर भांगे पाडावेत. जेणे करून पिकात हवाखेळती राहील. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. भांगे पाडलेल्या ओळीतून प्रतिपंपास कॉन्फीडॉर ७.५ मिलि आणि निंबोळी अर्क १५ मिलि या प्रमाणात फवारणी करावी. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, खंडाळा व वाई, मंडळ कृषी अधिकारी, खंडाळा व वाई, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माईणकर यांनी केले आहे.
- 1 of 351
- ››