agriculture news in marathi, Khandesh drought situation serious | Agrowon

खानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

जळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भाग आणि धुळे, नंदुरबारच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जलस्राेतच नसल्याने टॅंकरशिवाय पर्याय नाही. रब्बीसाठी पुरेसा जलसाठा धरणांमध्ये नसल्याने पुढील हंगामाची चिंता आहे. पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्‍न अनेक दुग्ध उत्पादकांना सतावू लागला आहे.

जळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भाग आणि धुळे, नंदुरबारच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जलस्राेतच नसल्याने टॅंकरशिवाय पर्याय नाही. रब्बीसाठी पुरेसा जलसाठा धरणांमध्ये नसल्याने पुढील हंगामाची चिंता आहे. पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्‍न अनेक दुग्ध उत्पादकांना सतावू लागला आहे.

वाघूर, हतनूर, गिरणा धरणांत सध्या पाणीसाठा असला, तरी मध्यम प्रकल्पांत ठणठणाट आहे. पाणीटंचाईची तीव्रता अधिक असेल, अशी शक्‍यता आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांत दुष्काळजन्य स्थिती आहे. दुष्काळाबाबत अंतिम अहवाल पाठविण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाची कार्यवाही गतीने सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागात दुष्काळाच्या दोन कळ लागू झाल्या आहेत. नंदुरबार व धुळ्यात अनुक्रमे नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, शिंदखेडा, धुळे, साक्री व शिरपुरात दुष्काळी स्थिती आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीची मागणी मंडळांमधून करण्यात येत आहे. जनावरांसाठी लागणारा चारा अल्प प्रमाणात आहे. रोजगार हमी योजनेंतर्गतही कामे नसल्याचे चित्र आहे. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे पीक सर्वेक्षण महसूल, कृषी विभागाने केले आहे.

जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, बोदवड, पारोळा या १३ तालुक्‍यांमध्ये पीक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पिकांची स्थिती अतिशय नाजूक असून उत्पादन येण्याची स्थिती नाही. रब्बीचा हंगामही संकटात आहे. याबरोबरच या तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाईची चिन्हे आहेत. चाऱ्याचा साठा अत्यल्प आहे. फेब्रुवारी अखेर चाराटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील हतनूर, मंगरूळ प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. वाघूरमध्ये ४४, गिरणामध्ये ४७ , अभोरा व सुकी प्रकल्पात अनुक्रमे ९९ व ९८ , यावलमधील मोर प्रकल्पात ५४, अग्नावती प्रकल्पात ५३ आणि हिवरामध्ये ३१ टक्के जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील बहुळा, तोंडापूर, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पात ८६ टक्के जलसाठा आहे.

धुळे जिल्ह्यातील मालनगाव, करवंद, सुलवाडे बॅरेज, पांझरा या प्रकल्पांमध्ये जलसाठा ९० टक्‍क्‍यांवर आहे. बुराई प्रकल्प कोरडाच आहे. नंदुरबारात प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्ये बऱ्यापैकी जलसाठा असला तरी दरा व इतर प्रकल्प भरलेले नाहीत.

इतर बातम्या
अकोला जिल्ह्यात मत्स्यपालन शेतीला...अकोला : शेतीला जोड धंदा म्हणून जिल्ह्यात या वर्षी...
नुकसानभरपाईसाठी जनावरांसह मोर्चा...बुलडाणा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, शेळी,...
शाश्‍वत स्‍वच्‍छता राखल्‍यास उत्तम...नांदेड ः शौचालय बांधकामात राज्‍याचे काम देशात उत्...
साताऱ्यात शेततळे योजनेस प्रतिसाद कमीसातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
भूजल उपशामुळे वाढले पाणीटंचाईचे संकटअमरावती : भूजलाच्या पुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष...
शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ धोकादायक ः पी...औरंगाबाद : शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत...
सौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे...मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री...
तूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना...यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या...
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
केळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...