agriculture news in marathi, Khandesh is ready for the rabbi season | Agrowon

रब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार पावसाची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

आमच्या भागात यंदा पाऊस कमी आहे. त्यामुळे गव्हाची पेरणी अधिक होणार नाही. परंतु चारा व धान्याचे चांगले उत्पादन देणाऱ्या मका पिकाची पेरणी वाढू शकते. हरभऱ्याची देखील सर्वाधिक पेरणी होईल.
- छगन पाटील, शेतकरी, निमझरी (जि. धुळे)

जळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याच्या अंतिम तयारीत शेतकरी आहेत. त्यानंतरच्या रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून तयारी सुरू आहे. सोयाबीनची मळणी पुढील १० दिवसांत पूर्ण होईल. दसरा सणापूर्वी पेरणीला वेगात सुरवात होईल, असे चित्र आहे. मात्र, कोरडवाहू पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

खानदेशात जवळपास अडीच लाख हेक्‍टरवर रब्बी पिके असतील. हरभरा सुमारे सव्वा ते दीड लाख हेक्‍टवर असेल. सोबतच कोरडवाहू ज्वारी (दादर) मका, गहू, बाजरी आदींची पेरणी होईल. दादरची पेरणी चोपडा, अमळनेर, जळगाव, शिंदखेडा, शिरपूर, धुळे, यावल या भागात अधिक केली जाते. कमी वाफसा असला तरी दादरचे पीक जोमात येते. पेरणीनंतर दाणे व्यवस्थित अंकुरतात. हरभऱ्याचीही कोरडवाहू पीक म्हणून शेतकरी पेरणी करतात. देशी वाणांची निवड त्यासाठी केली जाते. तापी, गिरणा काठ व पांझरानजीकच्या भागात कोरडवाहू पिके अधिक असतील.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० हजार हेक्‍टर मक्‍याची पेरणी होईल. उडीद, मुगाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात मक्‍याची लागवड सुरू झाली आहे. पाणी कमी असल्याने अनेक शेतकरी ठिबकवर मका पेरणी करीत आहेत. गव्हाची पेरणी खानदेशात ३० ते ३५ हजार हेक्‍टर, तर जळगाव जिल्ह्यात सुमारे १९ ते २१ हजार हेक्‍टरवर होणे अपेक्षित आहे. कृत्रिम जलसाठे मुबलक असल्याने रावेर, शहादा, यावल, चोपडा व पाचोरा तालुक्‍यांतील काही भागात त्याची पेरणी अधिक होईल. बागायती व कोरडवाहू हरभरा पेरण्यावरही शेतकऱ्यांंचा भर राहील. संकरित, काबुली प्रकारच्या हरभऱ्याची पेरणी शहादा, चोपडा, शिरपूर, रावेर, यावल भागात होईल.

खतांची तरतूद

खानदेशात रब्बी हंगामासाठी सुमारे पावणेदोन लाख मेट्रिक टन खतांची आवश्‍यकता असेल. १ लाख २० हजार मेट्रिक टन खते जळगाव जिल्ह्यात लागतील. युरियाची सुमारे ६० ते ७० हजार मेट्रिक टन गरज भासेल. यासंदर्भात तीन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांनी खते मागणी प्रस्ताव तयार केले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली.

 

इतर बातम्या
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
केळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...