agriculture news in marathi, Khandesh region to receive cotton seed before may edn | Agrowon

खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे उपलब्ध होणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

या हंगामात पूर्वहंगामी कापूस लागवड पाणीटंचाईमुळे कमी होईल. परंतु हंगामी लागवड पाच टक्‍क्‍यांनी वाढू शकते. बीटी कापूस बियाण्याची अधिक पाकिटे या हंगामात उपलब्ध होतील. रेफ्युज व बीटी वाण मिश्रित ५२५ ग्रॅमचे एक पाकीट असेल. गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी जूनमध्ये बियाणे जिल्हास्तरावर विक्रीसाठी वितरित होईल, अशी वरिष्ठांनी सूचना दिली आहे. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होईल, असे संकेत आहेत. याच वेळी कापूस लागवड जूनमध्ये व्हावी, गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र मोडीत निघावे यासाठी कापूस बियाणे मे महिन्याच्या अखेरीस खानदेशात उपलब्ध होईल. तशी सूचना राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी यंत्रणांसोबत मध्यंतरी झालेल्या व्हीसीमध्ये दिल्याची माहिती मिळाली आहे. 

पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी खानदेशातील तापी, गिरणाकाठ प्रसिद्ध आहे. शिरपूर (जि. धुळे), शहादा, तळोदा (जि. नंदुरबार), चोपडा (जि. जळगाव) या तालुक्‍यांमध्ये काही वर्षांपूर्वी तर एप्रिल अखेरीस पूर्वहंगामी कापूस लागवड व्हायची. मागील तीन वर्षात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तिचे जीवनचक्र मोडीत निघण्यासाठी कापसाखालील क्षेत्र किमान चार-पाच महिने रिकामे राहावे यासाठी कृषी विभाग व इतर यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

खानदेशातील कापसाखालील क्षेत्र जानेवारीतच रिकामे करण्याचे आवाहन या प्रयत्नातूनच करण्यात आले. याला काही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला तर काहींनी प्रतिसाद दिला नाही. या हंगामात खानदेशात तापी व गिरणाकाठी पूर्वहंगामी कापसाची लागवड होईल. परंतु ती मागील हंगामाच्या तुलनेत कमी राहील. मागील हंगामात खानदेशात सुमारे पावणेदोन लाख हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड झाली होती. या हंगामात ही लागवड दीड लाख हेक्‍टरपर्यंत असू शकते. कारण अनेक भागात पाणीटंचाई आहे. शेतकऱ्यांना पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र कमी करण्याशिवाय पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

जूनमध्येच जिल्हा स्तरावर या बियाण्याचे वितरण होईल, अशी शक्‍यता आहे. खानदेशात सुमारे ४० लाख बीटी बियाणे पाकिटांची आवश्‍यकता आहे. जळगाव जिल्ह्यातून २५ लाख पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. यात ३६ हजार पाकिटे देशी कापूस बियाण्याची मिळावीत, अशी अपेक्षा कृषी विभागाने वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. धुळे जिल्ह्यात आठ लाख तर नंदुरबारातही सुमारे १० लाख पाकिटांची आवश्‍यकता आहे. 

रेफ्युज व बीटी कापूस वाण मिश्रित पाकिटे या हंगामात मिळतील. त्याचे वजन ५२५ ग्रॅम राहील. यात ७५ ग्रॅम बियाणे रेफ्युज वाणांची असतील. मागील हंगामात काही कंपन्यांनी रेफ्युज वाणांचे १२० ग्रॅमचे स्वतंत्र लहान पाकीट बीटी वाणांमध्ये दिले होते. परंतु या हंगामात बीटी व रेफ्युज वाण मिश्रित पाकिटे बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती मिळाली. 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...