agriculture news in marathi, Khandip danger zone in Nanded, Parbhani, Hingoli due to rain | Agrowon

दीर्घ खंडामुळे नांदेड, परभणी, हिंगोलीत खरीप धोक्यात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे (ड्रायस्पेल) संवेदनशील अवस्थेतील खरीप पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. कडक उन्ह पडत असल्यामुळे उभी पिके होरपळून जात आहेत. मूग, उडदा पाठोपाठ सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांच्या उताऱ्यात मोठी घट येणार आहे.

पावसाचा खंड काळ वाढत चालल्याने खरीप हंगामावर संक्रात आली आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी गतवर्षीप्रमाणेच यंदाही संकटाच्या फेऱ्यात सापडले आहेत.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे (ड्रायस्पेल) संवेदनशील अवस्थेतील खरीप पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. कडक उन्ह पडत असल्यामुळे उभी पिके होरपळून जात आहेत. मूग, उडदा पाठोपाठ सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांच्या उताऱ्यात मोठी घट येणार आहे.

पावसाचा खंड काळ वाढत चालल्याने खरीप हंगामावर संक्रात आली आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी गतवर्षीप्रमाणेच यंदाही संकटाच्या फेऱ्यात सापडले आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशी ऐवजी सोयाबीनला प्राधान्य दिले. या तीन जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वसाधारण क्षेत्राच्या दीड पटीहून अधिक वाढला. सोयाबीनचे पीक वाढीच्या अवस्थेत असतांना जुलै-आॅगस्टमध्ये पडलेल्या दीर्घ खंडामुळे पाण्याचा ताण बसला. 

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेंगात दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीनचे पीक होरपळून गेले. पाते, फुले, बोंडे भरण्याच्या अवस्थेतील कपाशीचे पीक अजून काही काळ तग धरील; परंतु बोंडे परिपक्व होण्यासाठी पाणी नसल्याने उत्पादन घटणार आहेत. या तीन जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे.

आमच्या भागात सुरवातीपासूनच कमी पाऊस आहे. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन, कापूस वाळून गेले आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस आला होता. परंतु, त्याने झाडाखालची जमीनदेखील भिजली नाही. यंदा सर्वच पिकांच्या उताऱ्यात ५० टक्क्यांहून जास्त घट येणार आहे.
- सदाशिव पाटील, 
शेतकरी, हणेगांव, ता. देगलूर, जि. नांदेड

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...