देशातील कापूस पीकक्षेत्रात १९ लाख हेक्टरने वाढ
वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017
नवी दिल्ली ः देशातील भात, भरडधान्ये, तेलबिया पीक क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली अाहे. मात्र कापूस पीक क्षेत्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १९.१६ लाख हेक्टरने अधिक असल्याचे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अाकडेवारीनुसार दिसून अाले अाहे.
 
देशात शुक्रवार (ता.२२) पर्यंत खरीप पीक क्षेत्र १०५४.९७ लाख हेक्टरवर होते. गेल्या वर्षी याच कालावधीत १०६३.२८ लाख हेक्टरवर पीक क्षेत्र होते. एकूणच पीक क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी अाहे. मात्र कापूस पिकाने अधिक क्षेत्र व्यापले अाहे.
 
नवी दिल्ली ः देशातील भात, भरडधान्ये, तेलबिया पीक क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली अाहे. मात्र कापूस पीक क्षेत्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १९.१६ लाख हेक्टरने अधिक असल्याचे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अाकडेवारीनुसार दिसून अाले अाहे.
 
देशात शुक्रवार (ता.२२) पर्यंत खरीप पीक क्षेत्र १०५४.९७ लाख हेक्टरवर होते. गेल्या वर्षी याच कालावधीत १०६३.२८ लाख हेक्टरवर पीक क्षेत्र होते. एकूणच पीक क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी अाहे. मात्र कापूस पिकाने अधिक क्षेत्र व्यापले अाहे.
 
देशात यंदा १२१.७२ लाख हेक्टरवर कापूस पीक क्षेत्र अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १०२.५६ लाख हेक्टरवर कापूस पीक क्षेत्र होते. तेलंगणा, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाना, अांध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, गुजरात अादी राज्यांत कापूस पीक क्षेत्र अाहे. तेलंगणा, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाना अादी राज्यांत कापूस पीक क्षेत्रात अधिक वाढ झाली अाहे.
 
भात पीक ३७६.७६ लाख हेक्टरवर व्यापले अाहे. गेल्या वर्षी ३८१.७५ लाख हेक्टरवर भात पीक क्षेत्र होते. कडधान्ये पीक १४१ लाख हेक्टरवर, तर भरडधान्यांची लागवड  १८५.३५ लाख हेक्टरवर झाली अाहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली अाहे. 
 
तेलबिया पीक १६ लाख हेक्टरने कमी
तेलबिया पीक क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.४१ लाख हेक्टरने कमी अाहे. यंदा १७२.९४ लाख हेक्टरवर तेलबिया पीक क्षेत्र अाहे. गेल्या वर्षी ते याच कालावधीत १८९.४५ लाख हेक्टरवर होते. विशेषतः मध्य प्रदेश, अांध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, ओडिशा, पंजाब अादी राज्यांत तेलबिया पीक क्षेत्रात घट झाली अाहे.
 
उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात ऊस क्षेत्रात वाढ
ऊस पीक क्षेत्र ४९.९५ लाख हेक्टरवर पोचले अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस पीक क्षेत्रात वाढ झाली अाहे. गेल्या वर्षी ४५.६४ लाख हेक्टरवर ऊस पीक क्षेत्र होते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अादी प्रमुख राज्यांत ऊस पीक क्षेत्रात वाढ झाली अाहे. तर तमिळनाडू, कर्नाटकमधील ऊस पीक क्षेत्रात घट झाली असल्याचे दिसून अाले अाहे.

कापूस पीक क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये)

राज्य २०१७-१८ २०१६-१७
अांध्र प्रदेश ५.९५ ४.३५
तेलंगणा १८.६६ १२.३६
गुजरात २६.३६ २४.०९
हरियाना ६.५६ ४.९८
कर्नाटक ४.७७ ४.४२
मध्य प्रदेश ५.९९ ५.९९
महाराष्ट्र ४२.०४ ३८.०६
ओडिशा १.४५ १.३६
पंजाब ३.८५ २.५६
राजस्थान ५.०३ ३.८४
तमिळनाडू ०.७६ ०.४०
इतर ०.२८ ०.१७
एकूण १२१.७२ १०२.५५

स्त्रोतः कापूस विकास संचालनालय, नागपूर

 
 
 
टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...