agriculture news in marathi, In Kharif crisis in Aurangabad district | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप संकटात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : पावसाच्या प्रदीर्घ खंडासोबतच किडी रोगांसाठी पोषक वातावरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपावर संकटाचा डोंगर उभा आहे. उपाय योजतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत काही दिवसांत पाऊस पडला असला तरी निसर्गाची अपेक्षित साथ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील संकटाचे ढग कायमच असल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद : पावसाच्या प्रदीर्घ खंडासोबतच किडी रोगांसाठी पोषक वातावरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपावर संकटाचा डोंगर उभा आहे. उपाय योजतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत काही दिवसांत पाऊस पडला असला तरी निसर्गाची अपेक्षित साथ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील संकटाचे ढग कायमच असल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यात स्थिती विदारक आहे. प्रदीर्घ खंडानंतर १५ ऑगस्टनंतर तालुक्‍यात पावसाचे आगमन झाले असले तरी तालुक्‍यातील १३७ गावातील खरिपाच्या पिकांना या पावसाचा फायदा होण्याची शक्‍यता नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रदीर्घ खंडामुळे तालुक्‍यातील ४० हजार ५०५ हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र बाधित झाले आहे.

वैजापूर तालुक्‍यातील कपाशी व मकाच्या उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपर्यंत तर औरंगाबाद तालुक्‍यात २० ते ३० टक्‍के घट होण्याचा अंदाज आहे. फुलंब्री तालुक्‍यातील पीरबावडा मंडळातील सहा गावांत ५०० हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मकाचे पीक बाधित झाले असून कपाशी व मका पीक २० ते २५ टक्‍के घट होण्याचा अंदाज आहे. पैठण तालुक्‍यातील लोहगाव, बालानगर, बीडकीन व ढोरकीन मंडळातील काही गावात खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रावर पेरणी होऊच शकली नाही. या मंडळांमधील ११ गावांमधील विविध पिकांचे ६८६ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे पुढे आले आले आहे.

बोंड अळीची नुकसानीत भर
खुलताबाद तालुक्‍यातील सुलतानपूर व वेरूळ मंडळातील २२ गावांतील मका पिकाला पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. या पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. कन्नड व सोयगाव तालुक्‍यांतील १४ गावांतील कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रमाणाने नुकसानीची पातळी ओलांडली आहे.

 औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ः ६ लाख ८३ हजार ३७५ हेक्‍टर
 प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र ः ६ लाख ५८ हजार ६०७ हेक्‍टर

पिकाचे नाव अाणि अंदाजे नुकसान हेक्टरमध्ये
कपाशी ३८८८८४
सोयाबीन  १५१८०
बाजरी २४९३०
मका १७३१६२
तूर ३०३९२

 

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...