Agriculture news in marathi, Kharif crisis in northern Maharashtra | Agrowon

उत्तर महाराष्ट्रातील खरीप संकटात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018
नाशिक  : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरवातीला झालेल्या पावसाने पाठ फिरविल्याने विभागातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे कोरडे गेल्याने आणि पावसाचे पुनरागमन लांबल्यास यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत अवघ्या ०.११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लवकर पाऊस न झाल्यास त्या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता आहे.
 
नाशिक  : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरवातीला झालेल्या पावसाने पाठ फिरविल्याने विभागातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे कोरडे गेल्याने आणि पावसाचे पुनरागमन लांबल्यास यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत अवघ्या ०.११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लवकर पाऊस न झाल्यास त्या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता आहे.
 
मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पेरण्याही उरकून घेतल्या होत्या. मात्र, जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे  पेरण्या वाया जावून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. 
नाशिक विभागात गेल्या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या १६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र त्या केवळ ०.११ टक्क्यांवर आहेत. जूनअखेर उत्तर महाराष्ट्रात मागील वर्षीच्या वार्षिक सरासरीनुसार १८ टक्के तर यंदाच्या सरासरीनुसार अवघा १७ टक्के पाऊस झाला आहे.
तूर, मका व कापसाची लागवड
यंदा केवळ मका, तूर व कापूस या पिकांची काही प्रमाणात लागवड झालेली आहे. बाजरी, भात, ज्वारी, नागली, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, खुरसणी, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांची पेरणी अद्याप झालेली नाही. शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहेत. सुरवातीच्या पावसामुळे जमिनीची मशागत पूर्ण झालेली आहे.
 
विभागातील खरीप हंगाम पेरणी प्रगती (हेक्टर)
जिल्हा तूर    मका  कापूस
नाशिक   ०    ०  २.५०
धुळे ०  ०    ७८
नंदुरबार ०   ३१
जळगाव   २.७९   १२.५० ६०.३
एकूण २.७९     १२.५०      ७१४.५०

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...