Agriculture News in Marathi, Kharif crop harvest, Kolhapur district | Agrowon

खरीप पीककाढणीसह रब्बीची तयारी वेगात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017
कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शेतकऱ्यानी नि:श्‍वास टाकला अाहे. आता खरीप काढणीची कामे वेगाने सुरू आहेत.
 
ज्या शेतात वाफसा येईल त्या शेतात तातडीने कापणी व मळणी करून पीक सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड सुुरू आहे. यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत खरीप कापणीला पुन्हा वेग येईल अशी शक्‍यता आहे. 
 
कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शेतकऱ्यानी नि:श्‍वास टाकला अाहे. आता खरीप काढणीची कामे वेगाने सुरू आहेत.
 
ज्या शेतात वाफसा येईल त्या शेतात तातडीने कापणी व मळणी करून पीक सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड सुुरू आहे. यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत खरीप कापणीला पुन्हा वेग येईल अशी शक्‍यता आहे. 
 
जिल्ह्यात आक्‍टोबरचा पहिला पंधरवडा पूर्णपणे पावसाळी गेला आहे. दररोज एक ते दोन तास पडणाऱ्या पावसाने अनेक शिवारांत पाणी साचून राहिले. माळरानेही पाझरत असल्याने माळरानातील खरीप काढणीही खोळंबली. मध्यम व काळ्या प्रतीच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांची तर खूपच बिकट अवस्था झाली.
 
अगोदरच वेळाने होणारा निचरा व त्यात दररोज जोरदार पडणारा पाऊस यामुळे खरिपाची काढणी पूर्णपणे ठप्प झाली. सोयाबीन, भुईमूग पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला. अनेक ठिकाणी शेतात सोयाबीन खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना एक रुपयाही उत्पादन मिळाले नसल्याची स्थिती आहे.
 
कापणीच्या अवस्थेतील पिकात आठ ते दहा दिवस पाणी साचून राहिल्याने पूर्ण पीकच नष्ट झाल्याची स्थिती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक भागात आहे. नफा तर सोडाच; पण बऱ्याच शेतकऱ्यांना पदरमोड करून खरीप पिकांची मळणी करावी लागत आहे. 
 
अाता रब्बीच्या पेरण्या सुरू
सध्या वाफसा येत असल्याने खरिपाची आशा सोडून रब्बीच्या दृष्टीने तयारी करणे, अथवा नवीन ऊस लावणीसाठी शेत तयार करणे, या उद्देशाने शेतकरी खरिपाचे पीक काढून शेताची मशागत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दृश्य जिल्ह्यातील शिवारात आहे.
 
गेल्या चार दिवसांपासून स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने याचा फायदा वाफशासाठी होत आहे. यामुळे येत्या आठ दिवसांत खरिपाच्या काढणीला वेग येऊन रब्बीच्या पेरण्याही सुरू होतील, अशी शक्‍यता कृषी विभाग व शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात आली.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...