Agriculture News in Marathi, Kharif crop Harvest stopped due to rain, Kolhapur | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पीककाढणी ठप्प
राजकुमार चौगुले
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017
कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्यपूर्ण पावसामुळे खरीप काढणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. दररोज पडणाऱ्या पावसामुळे येत्या आठ दिवसांत तरी वाफसा येणे शक्‍य नाही. यामुळे काढणीस आलेली पिके आणखी आठ ते दहा दिवस तरी कापणी व मळणीविनाच रहाण्याचीच शक्‍यता आहे.
 
विशेष करून सोयाबीनला याचा फटका बसण्यची शक्‍यता निर्माण झाली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे माळरानावरही अनेक ठिकाणी पाझर फुटला आहे. यामुळे माळरानावरील व खडकाळ जमिनीतही अद्याप वाफसा आला नाही.
 
कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्यपूर्ण पावसामुळे खरीप काढणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. दररोज पडणाऱ्या पावसामुळे येत्या आठ दिवसांत तरी वाफसा येणे शक्‍य नाही. यामुळे काढणीस आलेली पिके आणखी आठ ते दहा दिवस तरी कापणी व मळणीविनाच रहाण्याचीच शक्‍यता आहे.
 
विशेष करून सोयाबीनला याचा फटका बसण्यची शक्‍यता निर्माण झाली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे माळरानावरही अनेक ठिकाणी पाझर फुटला आहे. यामुळे माळरानावरील व खडकाळ जमिनीतही अद्याप वाफसा आला नाही.
 
मध्यम व काळ्या प्रतीच्या जमिनीत तर अद्यापही पाणी साचून आहे. यामुळे पूर्ण पाऊस थांबल्यानंतर वाफसा येण्यास आठ ते दहा दिवस लागतील असे शेतकऱ्यांनी सांगितले.
 
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी वातावरणात जाणवणारा उष्मा व सायंकाळी दाटून येणारे ढग शेतकऱ्यांना खरिपाच्या काढणीपासून परावृत्त करत असल्याचे दृश्य जिल्ह्यात आहेत. 

 अनेक ठिकाणी वाटाही बंद असल्याने जरी कच्च्या वाफशावर कापणी केली, तर धान्य बाहेर काढण्याचीही अडचण शेतकऱ्यांना सतावत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिीमुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तत्काळ काढणी करण्याचा विचार बाजूूला ठेवला आहे.

पावसामुळे अद्याप ज्या प्रमाणात सोयाबीन व भाताची काढणी अपेक्षित होती; त्या प्रमाणात ती सुरू झाली नसल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.
 
सोयाबीन शिवारातच तडकण्याचा धोका
सध्या पक्व झालेले सोयाबीन शिवारात उभे आहे. तर शेतात पाणी व चिखल असल्याने शेतात जाऊ शकत नसल्याची परिस्थिती बहुतांशी शिवारात आहे. कडक ऊन पडत असल्याने पक्व झालेले सोयबीन शिवारातच तडकण्याचा धोका निर्माण झाल्याने यंदा आगाप पेरणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान अधिक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...