agriculture news in marathi, Kharif harvesting, threshing work start in kolhapur | Agrowon

कोल्हापुरात खरीप कापणी, मळणी कामांनी शिवारे गजबजली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : वळीव पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसताच जिल्ह्यात खरीप कापणी व मळणीच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या चार दिवसांत बहुतांशी ठिकाणी वळीव पाऊस झाला नाही. दिवसभर कडक ऊन असल्याने शेतकरी तातडीने खरीप पिकांची काढणी करून मळणी करीत असल्याने पुन्हा शिवारे शेतकऱ्यांनी गजबजून गेली आहेत.

कोल्हापूर : वळीव पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसताच जिल्ह्यात खरीप कापणी व मळणीच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या चार दिवसांत बहुतांशी ठिकाणी वळीव पाऊस झाला नाही. दिवसभर कडक ऊन असल्याने शेतकरी तातडीने खरीप पिकांची काढणी करून मळणी करीत असल्याने पुन्हा शिवारे शेतकऱ्यांनी गजबजून गेली आहेत.

जिल्ह्याच्या पूर्व भागात सोयाबीनचे; तर पश्‍चिम भागात भाताचे पीक जादा प्रमाणात आहे. सध्या ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा कालावधी यंदा शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा ठरला आहे. बदलत्या निसर्गातून वाचलेल्या पिकांची मळणी करुन आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकरी गडबड करीत आहे.

भाताची झोडपणी अनेक ठिकाणी हाताने मजुरांच्या साहाय्याने होत आहे. सोयाबीनसाठी मात्र मळणी यंत्राचाच वापर बहुतांशी ठिकाणी सुरू आहे. क्षेत्रानुसार शेतकरी लहान, मध्यम व मोठ्या आकाराच्या मळणी यंत्राला प्राधान्य देत आहे. संध्याकाळच्या वेळेला पाऊस येण्याची शक्‍यता असल्याने सकाळी आठ वाजल्यापासून कापणी करून दुपारनंतर मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पावसाची चिन्हे दिसताच तातडीने धान्य सुरक्षित ठेवण्याची यंत्रणा ठेवूनच शेतकरी मळणी करत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपवाद वगळता अनेक ठिकाणी सोयाबीन व भाताच्या उत्पन्नात दहा ते पंधरा टक्क्‍यांची घट येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

सलग झालेला पाऊस त्यानंतर पडलेले कडक ऊन व वळीवाच्या पावसाने आडव्या झालेल्या पिकांमुळे उत्पन्नात घट येत असल्याचे चित्र आहे. यातच डिझेलचे दर वाढत असल्याने मळणीयंत्र धारकांनीही भाड्यात काहीशी वाढ केली आहे. याचा भुर्दंडही शेतकऱ्यांवर बसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून मळणीच्या कामांनी वेग घेतला आहे. वळीव पाऊस न झाल्यास येत्या पंधरा दिवसांत बहुतांशी कापणी व मळण्यांची कामे पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे.

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...