agriculture news in marathi, Kharif loan account of 28% in the district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात २८ टक्केच खरीप कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 जुलै 2018

नाशिक : खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला, तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३० हजार ६८४ शेतकऱ्यांना ७३२ कोटी ७३ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. त्याची टक्केवारी फक्त २७.९१ टक्के आहे. पीककर्जासाठी बँकांनी २६२५ कोटी ७० लाखांचे लक्ष्य ठेवले असताना प्रत्यक्षात वाटप कमी आहे. बँकांनी विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचे बोलले जात आहे.

नाशिक : खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला, तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३० हजार ६८४ शेतकऱ्यांना ७३२ कोटी ७३ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. त्याची टक्केवारी फक्त २७.९१ टक्के आहे. पीककर्जासाठी बँकांनी २६२५ कोटी ७० लाखांचे लक्ष्य ठेवले असताना प्रत्यक्षात वाटप कमी आहे. बँकांनी विविध कारणांनी शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सर्व बँकांची बैठक घेऊन जास्तीत जास्त कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. ४  जुलैपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकेने १६ हजार १३० शेतकऱ्यांना ४६१ कोटी ३२ लाख कर्जवाटप केले असून त्याची टक्केवारी २४. ८० आहे. त्यांना १८५९ कोटी ८२ लाखांचे लक्ष्यांक देण्यात आला होता.
ग्रामीण बँकांनी १ कोटी ५ लाख कर्ज ६८ शेतकऱ्यांना, खासगी बँकांनी ५१ कोटी ३१ लाख कर्ज २ हजार ५० शेतकऱ्यांना आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने २१९ कोटी ५ लाखांचे कर्ज १२ हजार ४३६ शेतकऱ्यांना वाटप केले आहे. त्यांनी अनुक्रमे ३४७ कोटी ८० लाख, ४०४ कोटी ६५ लाख, १३ कोटी ४३ लाख रुपयांचे कर्जवाटप लक्ष्यांक ठरवले होते.

जिल्हा बँकेची अडचण
गेल्या वर्षी ४ हजार ११ कोटींचे लक्ष्यांक बँकेने ठेवले होते. त्यात जिल्हा बँकेचा आकडा मोठा होता. या वेळेस ती अडचणीत असल्यामुळे हात आखडते घेतले. त्यामुळे यंदा कर्जवाटपावर   परिणाम झाला. कर्जवसुलीचे प्रमाणही कमी असल्यामुळे बँकेची अडचण झाली आहे.

बँकांचे नियम अवघड
राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचे नियम व अटी किचकट असल्यामुळे त्यातून कर्जवाटप कमी होते. त्याचप्रमाणे पीककर्ज देण्यासाठी या बँकाही फारशा उत्सुक नसल्याने कर्जवाटपाची टक्केवारी कमी आहे.

पेरण्या २७.११ टक्के
पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात ६ लाख ५२ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ७६ हजार ९२८ हेक्टरवर पेरणी  झाली असून, त्याची टक्केवारी २७.११ टक्के आहे. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही पावसामुळे निर्माण झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...